Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तो रॉकस्टार, ती कीर्तनकार.. कशी होईल प्रेमकहाणी साकार..?; झी मराठीची सुरेल प्रेमकथा.. लवकरच

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 12, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hridayi Preet Jagte
0
SHARES
495
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेमाला संगीताची साथ असेल तर प्रेम सुरेल होतं. अशाच संगीतमय सुरांची साथ असलेल्या प्रेमाची प्रेमळ गोष्ट घेऊन झी मराठी आपले मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. सध्या मालिका विश्वात प्रचंड तगडी स्पर्धा आहे हे काही नव्याने सांगायला नको. त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी झी मराठी गेल्या काही काळापासून सलग एकापेक्षा एक भारी मालिका घेऊन येत आहे. आता एका नव्या संकल्पेनेसह एक नवी कोरी सुरेल प्रेमकथा झी मराठीच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी मराठीच्या या आगामी मालिकेचे नाव ‘हृदयी प्रीत जागते’ असे आहे. हि मालिका येत्या ७ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होतेय. ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा आहे. यामध्ये दोन तरुण मनांची सुरेल सांगड आपल्याला अनुभवता येणार आहे. एका नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच या दोघांच्या व्यक्तिमत्वाला दोन तत्त्वांची सुरेल साथ आहे. या मालिकेतील नायिका एक निस्वार्थी, प्रामाणिक आणि आज्ञाधारक मुलगी आहे. अतिशय घरंदाज, सर्व सामान्य आणि नम्र कुटुंबातील हि तरुणी आहे. तर मालिकेतील नायक हा हुशार, मोहक आणि लडिवाळ मुलगा आहे. ज्याला पाश्चिमात्य संगीताची प्रचंड आवड आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Khirid (@siddharthkhirid)

या दोन स्वभावाच्या आणि दोन सुराच्या व्यक्ती जेव्हा एकमेकांसोबत गातात तेव्हा सूर तर जुळले.. पण त्यांची मन जुळणार का..? हे पाहण्यासाठी हि मालिका जरूर पहा. कारण यातील नायिका कीर्तन गायिका आहे. तिच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. पण दोघांची सुरांवर खूप प्रेम आहे आणि हे सूरच त्यांना एकत्र आणणार आहेत. सिद्धार्थ खिरीद आणि पूजा कातुर्डे ही नवी फ्रेश तरुण जोडी या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मालिकेचे लेखन अभिजीत शेंडे यांनी केले आहे. तर दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केलाय आणि निर्मिती राजेश जोशी यांनी केली आहे.

Tags: Hridayi Preet JagteInstagram PostUpcoming Marathi SerialUpcoming SerialViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group