Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कल्याणमध्ये ‘अनन्या’ची सायकलस्वारांसोबत अनोखी राईड; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ananya
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २२ जुलै २०२२ असून प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ हा चित्रपट आज रिलीज होतोय. ‘अनन्या’च्या जिद्दीची कहाणी लोकांपर्यंत अगदी कानाकोपऱ्यात पोहचावी हे यामागील निर्मात्यांचे उद्देश आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. चित्रपटाची टीम शक्य ते सर्व प्रयत्न करून अनन्या चित्रपट लोकांपर्यंत पोहचवत आहे. दरम्यान चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळेदेखील हे पात्र जगली आहे. त्यामुळे ‘अनन्या’ तिच्या आयुष्यात फार महत्वाची आहे आणि अनन्यासाठी तिच्या सर्वात जवळची गोष्ट म्हणजे तिची जिवाभावाची सायकल. त्यामुळे चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी हृता स्वतः कल्याणमध्ये काही सायकल स्वारांसोबत सायकल चालवताना दिसली आहे. दरम्यान तिने आपला अनुभव देखील शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by PeepingMoon Marathi News (@peepingmoonmarathi)

या अनोख्या सायकल स्वारीबाबत बोलताना अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणाली कि, ‘एका सायकलस्वाराच्या आयुष्यात सायकलचं वेगळंच महत्व असतं. ‘अनन्या’च्या आयुष्यातही सायकल तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीसारखी आहे. त्यामुळे मला सायकल चालवताना पुन्हा एकदा ‘अनन्या’ जगता आली. एक वेगळाच अनुभव आला. आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी एक वस्तू असते जी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होते. ‘अनन्या’ आणि सायकलचं असलेलं नातं खूप वेगळं आहे. तुम्हाला ‘अनन्या’ पाहिल्यावर ते समजेलच. मुळात सायकलस्वार त्याचे ध्येय गाठण्यासाठी आपली संपूर्ण मेहनत पणाला लावतात. त्यांच्यात ध्येय साध्य करण्याची अफाट उर्जा असते. अशीच सकारात्मक उर्जा आपल्याला ‘अनन्या’मध्ये पाहायला मिळणार आहे.’

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

याशिवाय ‘अनन्या’च्या भूमिकेबद्दल विचारले असता हृता दुर्गुळे म्हणाली कि, ‘ज्यावेळी ‘अनन्या’साठी माझी निवड झाल्याचा फोन आला, आधी मला विश्वास बसत नव्हता. काही दिवस हे खरंय हे समजण्यात गेले. कारण ‘अनन्या’च्या निमित्ताने माझं चित्रपटात पदार्पण होणार होतं. पहिलाच चित्रपट एवढा मोठा, याहून आनंदाची गोष्ट कोणती असूच शकत नाही. या भूमिकेसाठी मला शारीरिक, मानसिक अशा सगळ्याच गोष्टींवर काम करावं लागलं. प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अर्थात यात मला अनेकांची साथ लाभली. ‘अनन्या’चा प्रवास माझ्यासाठी सुद्धा खूप आव्हानात्मक होता. या चित्रपटातून म्हणजेच ‘अनन्या’कडून मी काही गोष्टी शिकले, त्या म्हणजे आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानून आयुष्य पुढे न्यायचं आणि छोट्याछोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. आयुष्यात हे जमलं तर आपलं आयुष्य सुखकर होतं.’

Tags: AnanyaHruta DurguleInstagram PostMarathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group