टीम, हॅलो बॉलिवूड । व्यावसायिक चित्रपटांचा हुकमी दिग्दर्शक रोहित शेट्टी याने अवॉर्ड शोज विषयी एक वादग्रस्त विधान केलं आहे. तो म्हणतो, जेव्हा ते मला शोचे होस्टिंग करू देतात किंवा माझ्या एखाद्या चित्रपटाला पुरस्कार देतात तेव्हाच त्या अवॉर्ड शोला मी हजर असतो, जर त्यांनी मला पैसे दिले तरच मी जातो. कारण शेवटी ते सगळं बनावट असतं, तो फक्त एक टीव्ही शो असतो”, ‘नो फिल्टर नेहा’ या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये गप्पा मारताना होस्ट नेहा धुपियाला सांगितल.
रोहित शेट्टी पुढे असं म्हणतो की, “व्यावसायिक करमणूक करणार्यांना चित्रपटांना योग्य सम्मान दिला जात नाही. आम्ही खूप मेहनत करतो यार,आम्ही चित्रपटासाठी दिवसाला 18 तास काम करतो. व्यावसायिक चित्रपट बनवणे अधिक अवघड आहे. त्यामुळे मी अवॉर्ड शोवाल्यांना सांगतो, ‘जर तुम्हाला मला एखादा पुरस्कार द्यायचा असेल तर मी येतो, नाहीतर नाही”
रोहित शेट्टी दिग्दर्शित पुढच्या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत असतील, नाव सगळ्यांना माहितीच आहे ‘सूर्यवंशी’ हा पुन्हा एक कॉप ड्रामा आहे. अजय देवगण आणि रणवीर सिंह हेही यात गेस्ट ऍपीअरन्स करतील.