हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महानायक ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज त्यांची ओळख आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सिनेमे गाजवले. यातील कितीतरी डायलॉग आजही लोकांना जसेच्या तसे पाठ आहेत. हे डायलॉग्स अमिताभ यांच्या आवाजात इतके परफेक्ट वाटतात कि त्याबद्दल कायच बोलणार. अमिताभ यांचा आवाज, चेहरा तसेच नाव सध्या एक ब्रँड झाला आहे. ज्याचा सर्रासबाजारात वापर केला जातो आणि वाट्टेल त्या वस्तू खपवल्या जातात. आपल्या आवाजाचा. चेहऱ्याचा तसेच नावाचा होणार गैर वापर पाहता बिग बींनी ‘पर्सनॅलिटी राइट्स’ याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता विनापरवाना त्यांचा आवाज, चेहरा किंवा नाव वापरल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे.
Bollywood legend & Veteran Actor Amitabh Bachchan filed a suit in Delhi High Court seeking protection of his personality rights. Eminent lawyer Harish Salve appearing for him. The matter is underway before Justice Navin Chawla.
(File pic) pic.twitter.com/UlK3IPsh61
— ANI (@ANI) November 25, 2022
अमिताभ बच्चन यांचे नाव, चेहरा आवाज कोणत्याही गोष्टीसाठी विनापरवाना वापरल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. अमिताभ यांनी आपल्या बौद्धिक संपत्तीचा वापर आपल्या निर्देशांशिवाय केला जात आहे, असा आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार अमिताभ यांच्या बौद्धिक संपदेचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर करू नये, तसे केल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने बजावले आहे. उच्च न्यायालयाने अमिताभ यांच्याशी संबंधित बाबी हटविण्यास दूरसंचार मंत्रालयासह संबंधित विभागालादेखील आदेश दिले आहेत.
काही वर्षांमध्ये काही कंपन्यांनी, संस्थांनी आपले नाव,आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असल्याचे बच्चन यांनी याचिकेत म्हटले होते. यात एका केंद्रीय मंत्रालयाचेही नावदेखील समोर आले आहे. कहर म्हणजे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन यांच्या नावाने लॉटरीची जाहिरात चालू आहे. यावर बॅनरसाठी त्यांचा फोटोदेखील वापरला आहे. शिवाय केबीसीचा लोगोही आहे. लोकांचा भ्रमनिरास करण्यासाठी हे बॅनर लावल्याचा दावा बच्चन यांनी केला. त्यानुसार न्यायमूर्ती नवीन चावला आईनी सांगितले कि, प्रथमदर्शनी हे प्रकरण याचिकाकर्त्यांच्या बाजूने दिसत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्व अधिकारांचे हे उल्लंघन असल्याचा आरोप आहे. अशा परस्पर उपद्व्यापामुळे त्यांची बदनामी होते यात तथ्य असल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणास आले आहे.’
Discussion about this post