हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘जोधा अकबर’ मालिकेतील अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत गेल्या अनेक दिवसांपासून तब्येतीच्या तक्रारींमुळे हैराण झाले होते. एकतर आजारपण सुटत नव्ह्त त्यात आता त्यांनी स्वतःचा एक पायच गमावला आहे. होय. तुम्ही बरोबर वाचताय. डायबिटीजमुळे त्यांचा एक पाय कापावा लागला आहे.
‘जोधा अकबर’ या मालिकेत लोकेंद्र यांनी शमसुद्दीन अटागा खानची भूमिका साकारली होती. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतही ते झळकले होते. याशिवाय अनुराग बासू यांच्या ‘जग्गा जासूस’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘मलाल’ या चित्रपटांमध्येही ते झळकले होते.
#JodhaAkbar and #YehHaiMohabbatein actor #LokendraSinghRajawat's leg had to be amputated as his blood sugar rose beyond dangerous levels.https://t.co/7qca2H9ZEG
— The Quint (@TheQuint) August 3, 2021
मिळालेल्या माहितीनुसार लोकेंद्र यांच्या उजव्या पायात कॉर्न विकसीत झाला होता. हा संसर्ग इतका वाढला होता की तो संपूर्ण शरीरात हळूहळू पसरला आणि त्यामुळे अभिनेत्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी उजवा पाय कापण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे लोकेंद्र यांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट झाली होती. त्यात आता स्वत:चा एक पाय गमावल्यामुळे पुढे काय आणि कस निभावणार असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर येऊन उभा राहिला आहे. दरम्यान ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत लोकेंद्र यांनी सांगितले कि, डायबिटीजकडे दुर्लक्ष करू नका, इतकंच मी सांगेल. मी खूप भोगलं. आता माझ्या हातात काहीही नाही.
TV actor #LokendraSinghRajawat, of #JodhaAkbar fame, gets leg amputated till knee https://t.co/8LsrrYkp3t
— HT Entertainment (@htshowbiz) August 3, 2021
पुढे, कोरोना महामारीआधीपर्यंत मी स्वत:च्या पायावर उभा होतो. काम करत होतो. पण कोरोना महामारीच्या काळात काम मिळणं बंद झालं. घरात आर्थिक समस्या सुरू झाल्यात. चिंता वाढली. याकाळात माझ्या उजव्या पायात कॉर्न विकसीत झाला आणि त्याचा संसर्ग माझ्या बोन मॅरोपर्यंत पसरला. काहीच दिवसांत शरीरभर संसर्ग झाला. जीव वाचवायचा तर पाय कापणं आवश्यक होतं. त्यामुळं ५ तास शस्त्रक्रिया चालली आणि मी माझा एक पाय कायमचा गमावला. मी १० वर्षांपूर्वीच डायबिटीजला गंभीरपणे घेतलं असतं, तर आज माझा पाय गुडघ्यापर्यंत कापावा लागला नसता. आम्हा अभिनेत्यांकडे वेळ नसतो. अनेकदा जेवणासाठीही वेळ नसतो. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मला सिन्टाच्या माध्यमातून मदत मिळाली. अनेक कलाकारांनी फोनवर माझी विचारपूस करून धीर दिला. असेही लोकेंद्र यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
Discussion about this post