हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदा 2022 सालात आतापर्यंत बॉलिवूडमध्ये विविध दर्जेदार कथानक असलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. या चित्रपटांचे केवळ कथानक नव्हे तर त्यातील कलाकारांचा अभिनयदेखील वाखडण्याजोगा आहे. अशा या चित्रपटांचा सन्मान तेव्हा होतो जेव्हा फक्त प्रेक्षक नाही तर समीक्षकही त्यांना आपली पसंती देतात. IMDb रेटिंग हे प्रत्येक चित्रपटासाठी महत्वाचे असते. कारण हा पोल केवळ प्रेक्षकांचा नाही तर समीक्षकांचा कलदेखील दाखवतो. खरंतर यंदाच्या बॉलिवूड चित्रपटांची साऊथ चित्रपटांबरोबर जोरदार शर्यत लागली होती. ज्यामध्ये साऊथच्या चित्रपटांनी चांगलीच बाजी मारली आहे. यानंतर आता आपण जाणून घेऊया कि बॉलिवूडच्या कोणत्या चित्रपटांनी इंडियन मुव्ही कॅटेगरीमध्ये (IMDb) टॉप १० च्या यादीत समावेश मिळवला आहे.
IMDb ने हि पोस्ट शेअर करीत लिहिले आहे कि. ‘उर्वरित वर्षात काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही थोडेसे उत्सुक आहोत. २०२२ मधील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट सादर करत आहे (आतापर्यंत). तुम्ही या यादीतील किती पाहिले आहेत?
० रेटिंगनुसार IMDb टॉप 10 बॉलिवूड
1. विक्रम (8.8)
लोकेश कनांगराज दिग्दर्शित विक्रम हा चित्रपट ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित झाला. ब्लॅक ऑप्स टीमच्या सदस्यांनी मुखवटा घातलेल्या खुनींच्या टोळीचा मागोवा घेणे आणि त्यांना नष्ट करणे असे याचे कथानक आहे. या चित्रपटात अभिनेते कमल हसन आणि विजय सेथूपति हे मुख्य भूमिकेत दिसले होते.
2. KGF चॅप्टर 2 (8.5)
प्रशांत नील दिग्दर्शित KGF चॅप्टर २ हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अभिनेता यशने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवलं. या चित्रपटाची चर्चा संपूर्ण सोशल मिडियावर सतत राहिल्यानंतर आता आगामी चॅप्टर ३ बाबत प्रेक्षक आणि अगदी समीक्षकसुद्धा उत्सुक आहेत.
3. द काश्मीर फाईल्स (8.3)
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. काश्मिरी पंडितांच्या काश्मिरमधून झालेल्या स्थलांतरावर भाष्य करणारा हा चित्रपट अनेकांच्या काळजाला हात घालून गेला. या चित्रपटातून अनेकांनी एका भीषण वास्तवाची आणि होरपळलेल्या मनांची गोष्ट पहिली. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेते अनुपम खेर दिसले होते.
https://www.youtube.com/watch?v=aMLGS-Az8dc
4. ह्रदयमं (8.1)
विनीत श्रीनिवासन दिग्दर्शित ह्रदयमं हा चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी रिलीज झाला. हि गोष्ट वयाच्या ३० च्या दशकातील एक माणूस त्याचे चुकलेले तारुण्य आणि त्याला तारुण्यात आणलेल्या खडकाळ रस्त्याबद्दल विचार करतो अशी काहीशी आहे. जगायला शिकवणारे हे कथानक प्रेक्षकांना भावले होते.
5. RRR (8.0)
एस एस राजामौली दिग्दर्शित RRR हा चित्रपट २४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. एकावेळी विविध भाषांमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जातो. न बोलल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य वीरांची गाथा या चित्रपटात दर्शवली आहे. भीमा कोमाराम आणि अल्लुरी सीतारामन या स्वतंत्रवीरांच्या भूमिकेत अनुक्रमे जुनिअर एनटीआर आणि राम चरण हे कलाकार दिसत आहेत.
6. अ थर्सडे (7.8)
बेहझाद खंबाटा दिग्दर्शित अ थर्सडे हा चित्रपट १७ फेब्रुवारी २०२२ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेत्री यामी गौतम दिसली होती. हा एक थ्रिलर क्राईम ड्रामा असून याचे कथानक शेवटी भावनिक होताना दिसते.
7. झुंड (7.4)
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून हि भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनदेखील कौतुक करण्यात आले. या चित्रपटात खूप दिवसांनंतर सैराट फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर एकत्र पहायला मिळाले होते.
8. रनवे 34 (7.2)
अभिनेता अजय देवगण दिग्दर्शित आणि अभिनित रनवे हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओतिती प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगले रिव्ह्यू देत अजय देवगणच्या भूमिकेचे कौतुक केले होते. या चित्रपटात अजय देवगणसोबत राकुल प्रीत सिंगने स्क्रीन शेअर केली आहे.
9. सम्राट पृथ्वीराज (7.2)
चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित सम्राट पृथ्वीराज हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सम्राट पृथ्वीराज यांच्या जीवनावर आधारित कथानक दर्शवले आहे. या चित्रपटातील सम्राट पृथ्वीराज यांची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे तर त्याच्यासोबत मानुषी छिल्लर पहिल्यांदाच सिनेमात दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. शिवाय अक्षयच्या चाहत्यांनी देखील नाराजी दर्शवली होती.
10. गंगुबाई काठियावाडी (7.0)
संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट २५ फेब्रुवारी २०२२ रोजी रिलीज झाला. हा चित्रपट रेड लाईट एरिया आणि माफिया क्वीन गंगुबाई या रिअल लाईफ लेडीवर साकारला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटातील गंगुबाईची भूमिका अभिनेत्री आलिया भट्ट हिने साकारली आहे.
Discussion about this post