हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल टॉलिवूडच्या चित्रपटांपुढे बॉलीवूडचा निभाव लागत नाही हे काही वेगळ्याने सांगायला नको. हिंदी भाषिक प्रेक्षकही साऊथच्या सिनेमांकडे आकर्षित होत आहेत. याचे कारण चित्रपटांचे कथानक, ती मांडण्याची पद्धत, कलाकारांचा अभिनय आणि महत्वाचं म्हणजे विविध विषय. यामुळे साउथचे सिनेमे हिट पे हिट होत आहेत. यावर आता IMDb ने सुद्धा शिक्कामोर्तब केला आहे. नुकतीच IMDb ने या २०२२ वर्षातील टॉप १० चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा एकच चित्रपट समाविष्ट आहे. तर बाकी ९ चित्रपट साऊथचे आहेत.
IMDb ने सोशल मीडियावर हि यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये अगदी पुष्पा ते चार्ली ७७७ या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. बॉलीवूड आणि टॉलीवूड असा वाद याच वर्षात मोठा होताना आपण पाहिला. त्यातच आता बॉलीवूडला मागे टाकून टॉलीवूडच्या चित्रपटांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. खरंतर बॉलीवूडचा गंगुबाई काठियावाडी, दृष्यम २, ब्रम्हास्त्र, फ्रेडी हे चित्रपट उल्लेख करण्याजोगे आहेत. कारण यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण IMDb च्या टॉप १० मध्ये फक्त आणि फक्त ‘द काश्मिर फाईल्स’ने जागा मिळवल्याचे दिसून आले आहे. याचे आश्चर्य अनेकांना वाटत आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मोठ्या वादातही अडकला. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाला विशेष प्रेम दिले. जेवढं कौतूक तेवढ्या टीकांचा मानकरी असणारा हा चित्रपट IMDb च्या निवडक चित्रपटाच्या टॉप १० यादीत सहभागी झाला हि मोठी बाब आहे. यंदाच्या सर्वोत्तम भारतीय चित्रपट २०२२ – टॉप १० च्या यादीत समाविष्ट असणारे चित्रपट जाणून घेऊया.
Discussion about this post