हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मार्च २०१९ पासून कोरोना महामारीच्या काळात, मार्गदर्शक तत्त्वांमुळे बॉक्स ऑफिसला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. यानंतर आता हळूहळू चित्रपटगृहे सुरु झाली आहेत. मात्र तोपर्यंत ओटीटीने मात्र मनोरंजनाची धुरंदरा चांगलीच सांभाळली. यानंतर आता IMDB – टॉप 10 मध्ये कोणत्या सिनेमांचा समावेश आहे चला पाहूया.
१) शेरशाह – यामध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो शेरशाह या चित्रपटाचा. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट परमवीर चक्र पुरस्कार विजेते दिवंगत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर आधारित आहे. यामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवला आहे.
२) धमाका – या यादीत दुसऱ्या स्थानावर अलीकडे रिलीज झालेला अॅक्शन थ्रिलर चित्रपट धमाका याचा नंबर लागतो. हा चित्रपट राम माधवानी यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत आहे.
३) सरदार उधम – या यादीत तिसरा क्रमांक लागतो तो सरदार उधम या चित्रपटाचा. हा चित्रपट भारतीय स्वातंत्र्यसैनिक सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला पंजाबचे तत्कालीन लेफ्टनंट जनरल मायकल ओडवायर यांची हत्या करून घेतला होता.
४) मिमी – या यादीत चौथा क्रमांक लागतो तो मिमी या चित्रपटाचा. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित मिमी हा चित्रपट 26 जुलै रोजी प्रदर्शित झाला. यात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. हा संपूर्ण चित्रपट क्रितीभोवती फिरतो. यामध्ये कीर्ती परदेशी जोडप्यासाठी सरोगेट मदर बनण्याची निवड करते.
५) छोरी – छोरी या चित्रपटाचा या यादीत पाचवा क्रमांक लागतो. छोरी हा 2017 च्या मराठी चित्रपट लपाछपीचा रिमेक आहे. हा एक हॉरर चित्रपट आहे ज्यात प्यार का पंचनामा 2 मधील अभिनेत्री नुसरत भरुचा प्रमुख भूमिकेत आहे.
६) नेल पॉलिश – या यादीत नेल पॉलिश या चित्रपटाचा सहावा नंबर लागतो. या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि मानव कौल प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका सामाजिक कार्यकर्त्याच्या खटल्यावर आधारित आहे, ज्यावर स्थलांतरित मुलांवर बलात्कार आणि नंतर खून केल्याचा आरोप असतो. बग्स भार्गव कृष्णा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
https://www.instagram.com/p/CT7ZBXFhBhH/?utm_source=ig_web_copy_link
७) हाथी मेरे साथी – या यादीत सातवा नंबर लागतो तो हाथी मेरे साथी या चित्रपटाचा. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबती प्रमुख भूमिकेत आहे.
८) मीनाक्षी सुंदरेश्वर – या यादीत मीनाक्षी सुंदरेश्वर या चित्रपटचा आठवा क्रमांक लागतो. या चित्रपटात दक्षिण भारतातील मीनाक्षी सुंदरेश्वर नावाच्या एका गोंडस जोडप्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
९) रश्मी रॉकेट – या यादीत नववा क्रमांक लागतो तो रश्मी रॉकेट या चित्रपटाचा. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट विविध क्रीडा महिलांना सामोरे जाणाऱ्या जीवन संघर्षांवर आधारित आहे. हा चित्रपट आकर्ष खुराना यांनी दिग्दर्शित केला आहे.
१०) थलायवी – या यादीमध्ये दहावा क्रमांक लागतो तो थलायवी चित्रपटाचा. या चित्रपटात कंगना राणौत प्रमुख भुमीकेत आहे. थलायवी हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी सीएम दिवंगत जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे.
Discussion about this post