हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटावर निषेधाचे संकट ओढवले आहे. सर्वत्र हा चित्रपट बॉयकॉट करावा अशी मागणी प्रेक्षक करीत आहेत. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे हा वाद पेटला आणि हा वाद असा चिघळला कि चित्रपटाचे भविष्यचं धोक्यात आले. गाण्यामध्ये दीपिकाने भगवी बिकिनी परिधान करून हिंदुत्वाचा अपमान केला आहे. तसेच हिंदू धर्मियांच्या भावना मुद्दाम दुखावल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला. अखेर या गाण्यात महत्वाचे असे काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे हा चित्रपट वादमुक्त होऊ शकतो अशी चर्चा आहे.
अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या गॅपनंतर कमबॅक करत असताना चित्रपटावर आलेले संकट फारच त्रासदायी ठरले. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या बिकिनीच्या रंगावर सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच आक्षेप घेतला. यावरून वाद इतका चिघळला कि अनेक ठिकाणी निदर्शने झाली. या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादामूळे चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे जाताच चित्रपटात महत्वाचे बदल करावे अशा निर्णय बोर्डाने दिला.
याच पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी अखेर या चित्रपटात बदल झाल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले कि, ‘पठाण’मध्ये सेन्सॉरच्या नियमानुसार बदल करण्यात आले आहेत. आता बातम्या येत आहेत की सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच ‘बेशरम रंग’ या गाण्यात देखील बदल करण्यात आले आहेत, चित्रपटातील संवादांमध्येही अनेक शब्द बदलण्यात आले आहेत.’
‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात मोठे आणि महत्वाचे ३ बदल केल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, ‘बेशरम रंग’मध्ये दीपिकाचे काही क्लोज-अप शॉट्स घेतले आहेत. गाण्यातील ‘बहुत ही तंग किया’ या ओळींसह असलेले काही सेन्स्युस व्हिज्युअल बदलण्यात आले आहेत आणि त्याऐवजी इतर शॉट्स वापरण्यात आले आहेत.
‘बेशरम रंग’मधून दीपिकाची साइड पोजदेखील काढून टाकली आहे आणि या गाण्यातील दीपिकाच्या वादग्रस्त ‘केसरी रंगाच्या बिकिनी’चे शॉट्स अद्याप काढल्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच ‘पठाण’मधील १३ ठिकाणी पीएमओ बदलण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. अनेक डायलॉगमध्ये महत्वाचे बदल केले असून आता हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्येच प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
Discussion about this post