हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिओटी शो बिग बॉस सुरु होऊन अगदी काहीच दिवस झाले आहेत. यंदाचं हे पर्व बिग बॉस मराठीच चौथं पर्व असून यावेळी १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. सध्या घरात विविध टास्क दिले जात असल्यामुळे सगळ्याच पहिल्या पहिल्या आठवड्याच्या जोशात आहेत.
जिंकायला जो तो वाट्टेल ते करायला तयार आहे. पण या नादात स्पर्धकांमध्ये दोस्ती कमी आणि कुस्ती जास्त चालू आहे. त्यात पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांनी भांडायला सुरुवात केली. तेव्हापासून प्रसादची सतत चिडचिड आणि भांडण सुरूच आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही प्रश्न पडलाय कि, प्रसाद मुद्दाम भांडतो कि त्याला टार्गेट केलं जात आहे.
सध्या बिग बॉस मराठीच्या घरात कुठेही वाद झाला तर त्याच नाव कुठे ना कुठे प्रसादसोबत जोडलं जात आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यापासून प्रसाद कुणा ना कुणाशी भांडतोच आहे. यामुळे त्याला सदस्यांकडून कुठल्या न कुठल्या कारणावरून ऐकावं लागत आहे. सगळ्यात आधी अपूर्वा आणि त्याच्यामध्ये भांडणं झालं. त्यानंतर अक्षय आणि त्याच्यामध्ये वाद झाला. इतकंच काय तर यापुढे तेजस्विनी आणि त्याच्यामध्ये कामावरून बाचाबाची झाली. यामुळे घरातील काही सदस्यांनी प्रसादला म्हटले कि, ‘सगळं घरं तुला काही सांगतंय तर नक्कीच तुझं काहीतरी चुकत असावं’. यावर प्रसाद गप्प बसला असता तर कसं चाललं असत. मग प्रसादनेही प्रत्येकाला तोडीस तोंड उत्तर द्यायचं ठरवलंच आहे तर वाद होणारच ना.
या सर्व प्रकारामुळे प्रेक्षकांना एक प्रश्न पडलाय आणि तो प्रश्न असा आहे कि, प्रसाद घरून येतानाच रोज भांडायचं ठरवून आलाय..? कि घरातील प्रत्येक सदस्य ठरवून त्याला टार्गेट करत आहे…? आता नक्की काय चुकतंय आणि काय नाही..? ते तर चावडीच्या दिवशी महेश मांजरेकरच सांगतील असंही काहींनी म्हटलं आहे. आता नुकताच या घरात नवा वाद सुरु झाला आहे आणि तो म्हणजे पोळ्या करायच्या का नाही..? यावरून अक्षय आणि प्रसाद भिडले आहेत. त्यात अपूर्वानेही उडी घेतली. मग काय पेटलं प्रकरण. आता आज हा वाद आणखी वाढतो कि थांबतो ते पाहायला मिळणार आहे.
Discussion about this post