Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘एक फुल, दोन माळी’; बिग बॉस 16’च्या घरात बनतोय प्रेमाचा त्रिकोण..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2022
in Trending, TV Show, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
2.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १६ मधील सगळेच स्पर्धक एकमेकांसाठी खतरा बनताना दिसत आहेत. एकमेकांची उणी धुणी काढण्यापासून ते खाणं पिणं काढण्यापर्यंत हे स्पर्धक आधीच पोहोचले आहेत. यानंतर आता बिग बॉस १६ च्या घरात प्रेमाची खिचडी शिजणार असं दिसतंय. सध्या या घरामध्ये तीन स्पर्धक असे आहेत जे प्रेमाच्या त्रिकोणाच्या तीन बाजू झाले आहेत. यात फुल एकच आहे पण माळी दोन. आता हे फुल कुणाच्या बाजूने झुकतं माप घेणार ते अजूनतरी निश्चित नाही. आतापर्यंत तुम्ही समजला असालच कि आम्ही कुणाबद्दल बोलत आहोत. टीना, गौतम आणि शालीन.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस १६ च्या घरात प्रवेश केल्यानंतर सगळेच म्हणतात कि, मी इथे गेम खेळायला आलोय आणि मी फक्त तेव्हढच करणार. मला बाकी कशातही इंटरेस्ट नाही. प्रेम बीम करायला हि योग्य जागा नाही. एव्हढं बोलूनही हे स्पर्धक जरा जरा करत पूर्णच घसरतात. बिग बॉस हाऊसचा तर इतिहास आहे. यामध्ये कितीतरी स्पर्धक आले. त्यांना प्रेम झालं आणि काहींनी ते टिकवलं तर काहींचं फिस्कटलं. अलीकडेच एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्या एंगेजमेंटचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर आता यंदाच्या सिजनमध्ये अजून तरी फिक्स जोडी तयार झालेली नाही. पण टिनाच्या मागे शालीन आणि गौतम नावाचे दोन भुंगे फिरताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

नुकत्याच झालेल्या भागात शालीन भनोत गौतमला बोलताना दिसला कि, त्याला टीनाविषयी कुछ कुछ होता है! शालिनला टीनाबद्दल काहीशा प्रेमाच्या फीलिंग्स येत असल्याचे तो सांगताना दिसला. तर दुसरीकडे मात्र गौतम आणि टिनाची चांगली गट्टी होऊन ते एकमेकांच्या फार जवळ येताना दिसले. या सगळ्यात सूंबुलसोबत नाव जोडलं जाता जाता शालिनची गाडी तर टिनाकडे वळली हे काही वेगळच. यामध्ये गौतम फक्त शालिनला त्रास देण्यासाठी टीनासोबत वेळ घालवतोय कि त्याचंही मन टिनाकडे वळतंय..?आता महत्वाचं हे आहे कि, टिनाची गाडी कोणाकडे वळण घेते..? शालिनकडे का गौतमकडे. यासाठी बिग बॉसचे पुढील एपिसोड जरूर पहा.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostShalin BhanotTeena DuttaViral PromoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group