हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी’चा चौथा सीजन म्हणजे रिऍलिटी शोचा बाप. पण यावेळी सहभागी झालेले स्पर्धक म्हणजे बाप रे बाप. एकही असा नाही जो खेळताना मन आणि डोकं दोन्ही एकत्र वापरेल. कुणी शक्तीने खेळतं तर कुणी फक्त युक्तीने खेळत. पण तरीही बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनची गाडी टुकूटुकू चालतेय. या घरात पहिल्या दिवसापासून प्रचंड राडे, वाद, भांडण पहायला मिळाली. तेव्हढीच नातीही तयार झाल्याचे दिसले. पण बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर म्हणतात ना.. या घरात इथे कुणीही आपलं नसतं हेच खरं. याचा प्रत्यय किरण माने आणि विकास चोधरी यांच्या नात्यातील चढ उतारांवरून समजते.
‘बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवात झाल्यापासून घरातील काही सदस्य एकमेकांच्या अतिशय जवळ आल्याचे पाहायला मिळाले. आपण पाहत आलोय की, स्पर्धक किरण माने आणि विकास सावंत यांची अशी काही गट्टी जमली आहे कि बस्स.. एकदम भावंडांसारखं त्यांचं नातं तयार झालं आहे. यावरून अनेकदा त्यांना ऐकवलं देखील गेलं. किरण मानेंनी पहिल्यापासून विकासला आपलंसं करत लहान भावासारखं वागवलं आहे. शिवाय घरच्यांनी तुला कसं वेगळं केलंय याची सतत विकासला जाणीव करून देणारा एकमेव माणूस म्हणजे किरण माने. यावरूनच यंदाच्या चावडीत किरण माने यांना सर्व सदस्यांनी झापझाप झापले. त्याचा परिणाम असा झाला कि, किरण माने यांनी विकासची साथ सोडायचे पक्के केले आहे. त्यामुळे दोघांमध्ये येत्या काळात फूट पडणार असे दिसत आहे.
पहिल्यापासून मानेंच्या विरोधात कोणी काही बोलले तर विकासने कधीच लक्ष दिलं नाही. विकास किरण यांना प्रेमाने दाद्या म्हणजेच मोठा भाऊ म्हणून संबोधतो. त्यांनी या घरात एकमेकांना साथ दिली आणि इथपर्यंत प्रवास केला. पण आता हि मैत्री हे नातं लवकरच तुटणार असे संकेत दिसत आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दिसतंय कि, विकास किरणला खडसावुन बोलतो.. आता मी तुमच्याशी बोलणार नाही. तुम्ही तिथे माझ्यासाठी उभे पण नाही राहिलात. यावर किरण माने म्हणतात कि, आता मला एकटं व्हायचे आहे. यामुळे विकास दुखावला जातो आणि बोलतो दादा मला वाईट वाटतंय.. तिथे कोण नव्हतं तुम्ही होते. यावर किरण म्हणाले, राग काढ माझ्यावर पण स्वतःला त्रास करून नको घेऊस.’ यानंतर आजच्या भागात हि जोडी टिकणार कि तुटणार हे समजणार आहे.
Discussion about this post