Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नजरेतला जाळ.. येतोय बनून काळ’; ‘सर्किट’मध्ये मिलिंद शिंदेंनी साकारलाय संवादाविना थरकाप उडवणारा खलनायक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Circuitt
0
SHARES
148
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते मिलिंद शिंदे यांनी विविध भूमिकांमधून आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. पण ७ एप्रिलला प्रदर्शित होणारा “सर्किट” हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीकला अनोखा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकी भूमिकेसाठी त्यांच्या वाट्याला एकही संवाद नसून, केवळ शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर त्यांनी या भूमिकेत अभिनयाचे रंग भरले आहेत. भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत “सर्किट” या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Shinde (@milind_rshinde)

खलनायकी भूमिकेच्या वाट्याला स्वाभाविकपणे खटकेबाज संवाद येतात, शिवाय अभिनयाचीही संधी असतेच. पण सर्किट या चित्रपटातील खलनायकी भूमिकेला एकही संवाद नाही. केवळ डोळे आणि चेहऱ्यावरील हावभावातून ही भूमिका साकारणं अत्यंत आव्हानात्मक होतं. पण मिलिंद शिंदे यांनी हे आव्हान पेलत खलनायकी भूमिकेचा नवा मानदंडच प्रस्थापित केला आहे. सर्किट चित्रपटाच्या टीजर आणि ट्रेलरमधून चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मिलिंद शिंदे यांचा एकाही संवादाविना साकारलेला खलनायक ७ एप्रिलला चित्रपटगृहात पाहता येईल.

Tags: Hruta DurguleInstagram PostMilind ShindeUpcoming Marathi MovieVaibhav Tatwawadi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group