हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील हि भूमिका साकारत होते. या भूमिकेला लोकांकडून प्रचंड पसंती मिळत असतानाही चॅनेलने तडकाफडकी मानेंना मालिकेतून काढून टाकले. यानंतर आपल्या राजकीय भूमिकांमुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप मानेंनी केला होता. त्यावर मालिकेतील काही महिला सहकलाकारांनी सांगितले कि त्यांचे आमच्यासोबत वर्तन चांगले नव्हते. तर अन्य काही महिला सहकलाकारांनी सांगितले कि त्यांनी आमच्यासोबत कधीच गैरवर्तन केले नाही. यानंतर हे प्रकरण आणखीच चिघळलं असलयाचे पाहून आता स्टार प्रवाह वाहिनीकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सध्या किरण माने प्रकरणी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. किरण मानेंना सोशल मीडियावरून अनेकांचे समर्थन मिळत आहे. तर आता या प्रकरणावर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने आपली प्रतिक्रिया मांडली आहे. यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने एक परिपत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये किरण माने यांचं महिला कलाकारांसोबतचे वर्तन चांगले नसून त्यांच्यावर गैरवर्तणूक करीत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय कोणत्याही राजकीय कारणांमुळे किंवा ते घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळे त्यांच्यावर कारवाई केली नाही. तर त्यांच्या वाईट वर्तनामुळे त्यांना वारंवार तंबी दिल्यानंतर काढून टाकले आहे.
https://twitter.com/Princy_Vishu/status/1482677965318397952
स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी याआधी कोणतेही स्पष्टीकरण देणे योग्य समजले नव्हते. मात्र दिवसागणिक प्रकरण चिघळत असल्याचे दिसताच वाहिनीने थेट परिपत्रक जाहीर करीत या प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. यात लिहिले आहे कि, किरण मानेंना ते घेत असलेल्या राजकीय भूमिकेवरून काढलेले नाही. किरण माने यांनी चॅनेलवर लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. किरण माने यांना महिला कलाकारांसोबत गैरवर्तणूक केल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सहकलाकार, दिग्दर्शक आणि मालिकेतील युनिटमधील सदस्यांनी अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरूद्ध अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. याआधी त्यांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकले आहे.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post