हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील मालिका ‘लग्नाची वाइफ वेड्डिंगची बायकू’ने अगदीच कमी काळात प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या घराघरातून मनामनांत जागा निर्माण केली. हि मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित व्हायची. तसे पाहता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला आहे. मात्र तरीही यातील प्रत्येक पात्र अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. या मालिकेतील मदन , काजोल आणि मारिया हि तीन मुख्य पात्रे होती. आणि हि तिन्ही पात्र चांगलीच गाजली होती. यातील मदन आणि काजोल रील लाईफमध्ये नवरा बायको दाखविले होते. मात्र आश्चर्याची बाब हि कि आता रियल लाईफ मध्येही दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
मदन म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर आणि काजोल म्हणजेच अभिनेत्री रूपाली झंकार या ऑनस्क्रिन कपलने आता खऱ्या आयुष्यात ही एकमेकांसोबत आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच विजय आणि रूपाली यांचा साखरपुडा पार पडला आहे. रूपालीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोबतच साखरपुढ्याचे काही फोटोदेखील तिने शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत, विजय आणि रुपालीचा सारखपुडा अगदी साध्या पद्धतीने पार पडला.पहली ही नज़र में कुछ हम कुछ तुम हो जाते हैं यूँ गुम, नैनों से बरसे रिमझिम रिमझिम हम पे प्यार का सावन, शर्म थोड़ी थोड़ी हम को आये तो नज़रे झुक जाये… सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाये..असे कॅप्शन रुपालीने साखरपुड्यातील एका फोटोला दिले आहे.
रुपालीने शेअर केलेल्या फोटोवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. काही दिवसांपूर्वीच रुपालीचा मेहंदी कार्यक्रम देखील पार पडला होता. तेव्हाचाही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्यांच्या चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता साऱ्यांनाच यांच्या विवाहसोहळ्याची प्रतीक्षा आहे.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post