हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ च्या घरातील स्पर्धक दिवसामागे दिवस जातो तसे रोज नवीन मुद्दा काढून भांडायला लागतात. सध्या घरात सगळ्यांच्या मनात आग भडकतेय. नुकतीच शिव ठाकरेंची कॅप्टन्सी जाऊन अर्चना गौतमच्या नावे करण्यात आली आहे. त्यानंतर घरात जे राडे झाले आहेत त्याबद्दल काय बोलायचं कामच नाही. अर्चनाने रात्रभर धिंगाणा घालून घरातील प्रत्येकाला जो मानसिक त्रास दिला त्याबद्दल सगळेच सापरधक तिच्यावर नाराज होते. यामुळे सगळ्यांनाच कसा ना कसा तिच्यावर राग काढायचा होता. या नादात गोरी नागोरीकडून काही चुकीचे वर्तन घडले आणि यामुळे विकेंडच्या वारला तिला घराबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
अर्चनाचा आवाज आणि तिच्या वर्तनामुळे घरातील वातावरण रोजच खराब होताना दिसत असते. ज्यामुळे अर्चनाला कॅप्टन्सी मिळताच सगळे सापरधक तिच्यावर तुटून पडले. शिव किती खराब कॅप्टन आहे हे दाखवून अर्चना आणि प्रियंकाने तर आधीच एक लढाई जिंकली होती. त्यात शिवची कॅप्टन्सी काढून अर्चनाला दिल्यामुळे अर्चना भलतीच खुश होते. अशावेळी तिला धडा शिकवण्यासाठी गोरी तिच्याविरोधात बंड पुकारले आणि जशी अर्चना वागत होती तशीच तीसुद्धा वागायला लागते. या नादात कॅप्टनच्या रूममध्ये घुसखोरी, धक्काबुक्की असं सगळं गोरीने केलं. शिवाय बिग बॉसला ‘मी हिला मरेन.. आज इथे कुणाचे तरी हात पाय तुटतील’ असे वारंवार म्हटले गेले.
शो होस्ट सलमान खान याला डेंग्यूची लागण झाल्यामुळे तो या विकेंड वारला उपस्थित राहू शकला नाही. पण विकेंड वार अतिशय महत्वाचा होता आणि म्हणून सलमानची जागा ओटीटी बिग बॉस होस्ट केलेला चित्रपट निर्माता करण जोहरने घेतली. यावेळी करणने गोरीचा क्लास लावला आणि तिला तिच्या चुका दाखवल्या. शिवाय तिच्या कृत्याबाबत घरातील इतर सदस्यांना तिची मनषा काय होती..? अशी विचारणा केली. सर्वांनी तिच्या वर्तनाचा निःशेष नोंदविला. ज्यामुळे करणने तिला झापताना तुला घरात राहायचंय कि बाहेर जायचंय..? असा सवाल केला. आता आजच्या भागात गोरी घरात राहणार कि बाहेर जाणार हे समजेल.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post