हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अभिनित ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट आज ३ जून २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला असून याचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. अक्षय कुमारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे हे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. यानंतर योगींनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यानंतर हा चित्रपट उत्तर प्रदेश राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
इस प्रोत्साहन के लिए बहुत बहुत धन्यवाद @myogiadityanath जी 🙏🏻 https://t.co/oRqmBsdXMF
— Akshay Kumar (@akshaykumar) June 2, 2022
याबाबत योगींनी ट्विट करून माहिती दिल्यानंतर अक्षयने त्यांचे आभार मानले आहेत. या प्रोत्साहनासाठी धन्यवाद असे त्याने ट्विट केले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हा चित्रपट पाहून अतिशय प्रभावित झाले आहेत अशी त्यांनी भावना व्यक्त केली आहे. या चित्रपट निर्मितीबद्दल त्यांनी दिग्दर्शक तसेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, “अक्षय कुमारने इतिहास उत्तमरित्या दाखवला आहे. याच कारणामुळे मी त्याचे अभिनंदन करु इच्छितो,” याआधी अभिनेता अक्षय कुमार याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठीदेखील या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजित केले होते. दरम्यान स्क्रिनिंगनंतर अमित शाह यांनीसुद्धा चित्रपटाचे भरभरून कौतुक केले होते.
‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात अक्षय सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारतोय. हा संपूर्ण चित्रपटच राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मिस इंडिया ‘किताब जिंकलेली मानुषी छिल्लर हि पहिल्यांदाच चित्रपट सृष्टीत अभिनय क्षेत्रात काम करताना दिसत आहे. तसेच या चित्रपटात अक्षय आणि मानुषी यांच्याव्यतिरिक्त संजय दत्त आणि सोनू सूद यांच्याही अन्य महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला आहे.
Discussion about this post