हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव हे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर बायोपिक बनवीत आहेत. हा बायोपीक चित्रपट ‘द अनटोल्ड वाजपेयी- पॉलिटिशियन अॅन्ड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटावर काम सुरु असून याचे दिग्दर्शन आपण करणार असल्याचे रवी जाधवने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु होती कि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार कोण..? तर या प्रश्नाचे उत्तर देत रवी जाधवने पंकज त्रिपाठीच्या नावाची घोषणा केली आहे.
वाजपेयींचा चित्रपट साकारताना एक विशेष जबाबदारी रवी जाधव यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे बराच वेळ घेऊन या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात इंस्टाग्रामवर पोस्ट करताना रवी जाधवने लिहिले आहे कि, ‘मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए- अटल’. या कॅप्शनवरून अनेकांनी हेच चित्रपटाचं नाव आणि टॅगलाईन असणार असा अंदाज वर्तवला आहे. अटलजींची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी दमदार अभिनेता अपेक्षित होता आणि आता पंकज त्रिपाठी यांचे नाव समोर आल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपीकची घोषणा २३ जून २०२२ रोजी करण्यात आली होती. मात्र हा बायोपिक तयार करताना बऱ्याच गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक होते आणि त्यामुळे मध्यवर्ती भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड फार काटेकोरपणे करण्यात आली आहे. खरंतर वाजपेयींची भूमिका कोणी साकारावी याबाबत कुणालाच काहीच अंदाज लागत नव्हता. मात्र अखेर डोळ्यासमोर त्रिपाठी आले आणि हि भूमिका त्यांनी साकारायचे निश्चित झाले. या भूमिकेविषयी बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले की, ‘एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याची भूमिका पडद्यावर साकारणं हा मी माझा सम्मान समजतो. एक राजकीय नेता असण्यासोबतच ते एक उत्तम लेखक आणि कवी होते. माझ्या सारख्या अभिनेत्याला त्यांची व्यक्तीरेखा साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे.’
Discussion about this post