नवी दिल्ली । कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. आज दिवसभरात देशभर नवे १६८४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २३ हजार पार गेली आहे. तसेच आत्तापर्यंत ४ हजार ७४८ जण कोरोनातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ताज्या आकडेवारीनुसार भारतातील करोना रुग्णांची संख्या २३ हजार ७७ इतकी झाली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढते आहे तिथे जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. करोना हा इतर साथीच्या रोगांसारखाच बरा होणारा आजार आहे. मात्र याचा रुग्ण त्वरित लक्षात येणं आवश्यक आहे. नागरिकांना अधिकृत माहिती वेळेवर मिळावी यासाठी शासनाकडून COVID 19 नावाचे ट्विटर हँडलही सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
आतापर्यंत देशात #COVID19 च्या एकूण रुग्णांची संख्या 23,077 इतकी झाली आहे.
बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,748
80 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही – @MoHFW_INDIA #IndiaFightsCorona pic.twitter.com/K2YDpgL5Ub
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) April 24, 2020
80 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही
मागील २८ दिवसात देशातल्या १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ८० जिल्हे असे आहेत जिथे मागील १४ दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही असंही अग्रवाल यांनी सांगितले आहे.