Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

इंडियन आयडॉल फेम अरु-दीपच्या लग्नाचा फोटो व्हायरल?; चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 9, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो म्हणजेच सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल. अलीकडेच इंडियन आयडॉल’चा १२वा सीझन पार पडला आणि हा सीजन विविध कारणांमुळे अतिशय चर्चेत आला होता. या शोमधून अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने असंख्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. या शो दरम्यान त्यांची केमिस्ट्री इतकी भन्नाट रंगली कि बस्स. सगळीकडे सोशल मीडियावर पवनदीप आणि अरुणिता यांचीच चर्चा होती. त्यामुळे अजूनही त्यांची जोडी कुणीही विसरू शकेलेलं नाही. त्यात आता अरुणिता – पवनदीपचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात ते नव्या जोडप्याप्रमाणे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Musical Tv (@musical__tv_)

सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अरुणिता कांजीलाल लाल रंगाच्या दुल्हन लेहेंग्यामध्ये दिसतेय. तर पवनदीप नवरदेवासारखा शेरवानीमध्ये दिसतो आहे. दोघांच्या या फोटोवर चाहत्यांच्या शुभेच्छापूर्वक कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. या शुभेच्छा साध्यासुध्या नाहीत. तर, चाहत्यांनी पवनदीप आणि अरुणिताला त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होय. हा फोटो पाहून अनेक चाहते जणू संभ्रमात पडले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र एडिटिंग उत्तम प्रकारे केली असल्याचे म्हटले आहे. याशिवाय अरुणिता – पवनदीपच्या चाहत्यांनी खरेच लग्न करणार का? असा सवालही केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Musical Tv (@musical__tv_)

पण मुद्दा असा आहे कि हा फोटो जितक्या वेगाने व्हायरल होतोय तितक्या वेगाने याबाबत सत्यता तपासली जात नाहीये. कारण अजूनही व्हायरल झालेल्या या फोटोबाबत अरुणिता आणि पवनदीप या दोघांपैकी कुणीही काहीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे आता जोपर्यंत त्यांच्यापैकी कुणी यावर बोलत नाही तोपर्यंत या फोटोमागील मूळ सत्य काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहील.

View this post on Instagram

A post shared by Musical Tv (@musical__tv_)

पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल या दोघांची ओळख ‘इंडियन आयडल’ शोमध्ये झाली आणि तेव्हा त्यांच्या लव्ह अँगलची चर्चा रंगली होती. आता शो संपला पण दोघांचे फोटो आणि व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर धमाल करताना दिसतात. पण या फोटोचे काय? या फोटोत दिसणारे सत्य आहे का असत्य? कोण करणार खुलासा? हेच सध्या महत्वाचे आहे.

Tags: Arunita KanjilalIndian Idol 12 FameInstagram PostPawandeep RajanViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group