हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास कॉमेडीपेक्षा आजकाल त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच जास्त चर्चेत येऊ लागला आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने देशाच्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर आता वीर दासचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याने पुन्हा एकदा भारतातील महिलांच्या स्थितीबाबत वक्तव्य केल्यामुळे तो चांगलाच अडचणीत आला आहे. वीर दासच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर त्याच्यावर देशाचा अपमान केल्याचा आरोपही केला जात आहे. शिवाय दिल्लीत त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे.
वीर दास सध्या अमेरिकेत आहे आणि अलीकडेच त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडिया’ नावाचा एक स्टँडअप व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ जॉन एफ केनेडी सेंटर, वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्याच्या स्टँडअप लाईव्ह परफॉर्मन्सपैकी एक आहे. हा व्हिडीओ साधारण ६ मिनिटांचा असून यात वीर आपल्याच देशातील लोकांच्या दुहेरी चारित्र्याबद्दल बोलत आहे. ज्यामध्ये त्याने कोविड-१९ महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते अगदी शेतकरी प्रदर्शन यासारखे मोठमोठे मुद्दे आपल्या कॉमेडी मनोरंजनाचा भाग बनवले. मात्र हा व्हिडीओ समोर येताच देशातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आणि यामुळे वीरला त्यांचा रोष पत्करावा लागत आहे.
Delhi: Complaint received against actor-comedian Vir Das at Tilak Marg Police Station in connection with a viral video in which he is allegedly using derogatory language against the nation during an event in US.
(Photo courtesy: Vir Das' Instagram account) pic.twitter.com/KfTeH08oX9
— ANI (@ANI) November 17, 2021
या व्हिडीओमध्ये वीर म्हणतो, ‘मी अशा भारतातून आलो आहे जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री बलात्कार केला जातो. मी भारतातून आलो आहे जिथे लोक शाकाहारी असल्याचा अभिमान बाळगतात पण त्याच शेतकऱ्यांना त्रास देतात. यानंतर दिल्लीमध्ये वीरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदाचित म्हणून का काय या वादाची ठिणगी होऊ नये म्हणून वीरने सोशल मीडियावर याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
तो म्हणतोय कि, ‘देशाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, परंतू सर्व प्रकरणांनंतरही देश महान आहे याची आठवण करून देण्याचा हेतू आहे. व्हिडीओमध्ये एकाच विषयावर दोन भिन्न मते असलेल्या लोकांबद्दल बोलले जात आहे आणि हे रहस्य नाही जे लोकांना माहित नाही…’ असं स्पष्टीकरण वीर दासने दिलं आहे.
Discussion about this post