हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात जणू लग्नाचा सीजन आला आहे. अनेक मराठी कलाकारांनी आपापले जोडीदार निवडले असून ते लग्नबंधनात अडकताना दिसले आहेत. यात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा लग्नाची मोठी चर्चा राहिली. यानंतर आशय कुलकर्णी आणि अलीकडेच सुमित पुसावळे यांनीही आपली लग्न उरकली. अशातच आता मराठी सिनेसृष्टीचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबदेखील लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
सध्या सोशल मीडियावर अभिनेता प्रथमेश परबचा एक फोटो जबरदस्त व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रथमेशने शेरवानी परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्या हातात वरमाला सुद्धा आहे. इतकंच काय तर त्याच्या कपाळावर मुंडावळ्यासुद्धा स्पष्ट दिसत आहेत. या फोटोवर लिहिलं आहे कि, ‘आमचं ठरलं आहे.. लग्नाला यायचं हं..! पत्रिका गुरुवारी पाठवतोय.’ तर प्रथमेशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘सगळेच विचारतायेत… विचार केला सांगूनच टाकू… गुरुवार पर्यंत काय ते कळ काढा!’ प्रथमेशने शेअर केलेली हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
प्रथमेशच्या पोस्टवरून तो खरंच लग्न करतोय आणि गुरुवारी लग्न पत्रिका शेअर करेल असे वाटत आहे. तर दुसरीकडे असाही अंदाज बांधला जातोय कि, कदाचित हे पोस्टर असेल आणि प्रथमेशचा आगामी सिनेमा येत असेल. आता हि शक्यताही नाकारता येणारी नाही. कारण सध्या हटके प्रमोशन हा एकच फंडा लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो आहे. हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से आमीर है… म्हणणारा दगडू खरंच लग्न करतोय का..? तुम्हाला काय वाटत..?
Discussion about this post