हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याचे आजकालचे दिवस काही बरे सुरु आहेत असे म्हणता येणार नाही. मोठ्या गॅपनंतर शाहरुख आपल्या चाहत्यांसाठी धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. अशातच त्याच्या आगामी चित्रपट ‘पठाण’मूळे असा काही वाद उफाळला कि पुढचं वर्ष कसं जाईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. चित्रपटातील एका गाण्यामुळे सोशल मीडियावर बॉयकॉट पठाण ट्रेंड करू लागला आहे. ज्यामुळे निर्माते माघार घेत आता हा चित्रपट थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा विचार करत आहे.
शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकीनीने चांगलाच वाद ओढून घेतला.
याशिवाय ‘झूमे जो पठाण’ या गाण्याची धून चोरी केल्याचा आरोपदेखील लावला जात आहे. ज्यामुळे पठाणवरील संकटांची वारी अद्याप कायम आहे. त्यामुळे असा दावा केला जात आहे कि, ‘पठाण’ चित्रपटाचे भविष्य धोक्यात असल्याचे पाहता निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचे योजिले आहे.
अद्याप ‘पठाण’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र येत्या वर्षात मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. असेही बोलले जात आहे कि, ‘पठाण’ चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकारा हे प्रसिद्ध जागतिक OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime’ला सोपविण्यात आले आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘पठाण’ चित्रपटाचे हक्क २00 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत.
Discussion about this post