हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तब्बल १० ते ११ दिवसाच्या महा सत्ता नाट्यानंतर सरकार पूर्ण कोसळून एक नवं सरकार स्थापन झालं. ठाकरे सरकारला दणका देत शिंदे सरकार मोठ्या थाटात स्थापन झालं खरं, पण महाराष्ट्रातल्या गोंधळाला काही पूर्णविराम नाही असच म्हणावं लागेल. एव्हढा सत्ता संघर्ष संपतो ना संपतो तोच आता ‘आरे’चा वाद उफाळला आहे. काही वर्षांपूर्वी पर्यावरण प्रेमींनी केलेल्या आंदोलनामुळे आरेमध्ये कारशेड करण्याच्या निर्णयावर स्थगिती आली होती. पण आता फडणवीस आणि शिंदे यांनी सरकार येताच पुन्हा आरेमध्ये कारशेड होणार असे जाहीर केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा ‘आरे बचाव’ या आंदोलनाची उभारणी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच विचारी कलाकारांपैकी एक अभिनेता सुमीत राघवन याने ‘आरे’ येथे कारशेड करण्याला पाठिंबा देणे हे थोडे अचंबित करणारे आहे.
एक वेगळा voice ऐका.
मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे.
आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे.
आम्हाला @MumbaiMetro3 ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे.
राहिला मुद्दा carshed चा,तर #CarShedWahiBanega.. म्हणजे कुठे? तर #आरे मध्येच. pic.twitter.com/qA6EnjkRNR— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 2, 2022
अभिनेता सुमीत राघवन याने ‘कारशेड आरेतच होणार’ असे ट्विट केल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. रविवारी ३ जुलै रोजी आरेमध्ये एक आंदोलन करण्यात आले आणि त्या आंदोलनासाठी एकत्र या असे आवाहन करणारे कुर्ल्यातील एका संस्थेचे पोस्टर शेअर करत सुमीतने लिहिलं कि, ‘एक वेगळा voice ऐका. मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. आम्हाला @MumbaiMetro3 ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे. राहिला मुद्दा carshed चा,तर #CarShedWahiBanega.. म्हणजे कुठे? तर #आरे मध्येच.’ हे ट्विट पाहून राघवन आरे कारशेडला पाठिंबा देत असल्याचे चिडून येते. यासोबत, ‘@Dev_Fadnavisजी @mieknathshinde जी कळकळीची विनंती करतोय की आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही. जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये..? पैसा, जीव, वेळ.. काही किंमत आहे की नाही.? असेही त्याने एक ट्विट केले आहे.
@Dev_Fadnavis जी@mieknathshinde जी कळकळीची विनंती करतोय की आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही.
जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये?
पैसा,जीव,वेळ..काही किंमत आहे की नाही?— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 2, 2022
देवेंद्र फडणवीस यांच्या मागील सरकारच्या काळातही त्यांनी ‘आरे’ येथे मेट्रो तीनचे कारशेड होणार असे जाहीर केले होता. यानंतर पर्यावरण प्रेमींनी मोठं आंदोलन छेडलं होत. अनेक पर्यावरण प्रेमींनी आपल्या प्राणांची बाजी लावून हा लढा दिला आणि फडणवीस सरकारला विरोध केला. यानंतर फडणवीस सरकार जाऊन ठाकरे सरकार आलं आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘आरे’ येथील कारशेड रद्द करून ते कांजुर येथे हलवण्याचे ठरवले. त्यानंतर हा वाद हे आंदोलन सगळं काही मिटलं होत. पण आता फडणवीस सरकारमध्ये येताच त्यांनी पुन्हा एकदा या वादाला तोंड फोडलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्ज) साठीचं कारशेड आरेमध्येच बनणार या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आणि समस्त पर्यावरणप्रेमींनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे.
Discussion about this post