Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध TV अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी होणार आई..?; पती विवेक दहिया म्हणाला, ‘माझी बायको प्रेग्नेंट…’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 5, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Divyanka Tripathi_VivekDahiya
0
SHARES
247
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील कलाकार कधी प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातात ते त्यांनाही कळत नाही. विविध भाषेतील विविध मालिका या प्रेक्षक रोज न चुकता पाहतात. मग या मालिकेतील कलाकार त्यांच्या रोजच्या चर्चेचा विषय ठरतात. हे कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कसे असतील..? काय करत असतील..? त्यांच्या कुटुंबात कोण आहे.? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. अशीच एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे जिच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. हि अभिनेत्री आहे दिव्यांका त्रिपाठी. तिच्या पतीने या चर्चांबाबत मोठा खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तीची फॅन फॉलोइंग फारच जबरदस्त आहे. ‘बनू में तेरी दुल्हन’ची विद्या आणि ‘ये है मोहब्बतें’ची इशिता भल्ला आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. दिव्यांका तिच्या अभिनय कारकिर्दीशिवाय वैयक्तिक आयुष्यामूळेदेखील चर्चेत असते. दिव्यांकाचा पती विवेक दहियादेखील टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून दिव्यांका त्रिपाठीच्या प्रेग्नंन्सीबाबत बातम्या येत होत्या. इतकेच नव्हे तर दिव्यांका आणि विवेकने बाळाचे नाव देखील ठरवल्याचे बोलले जात होते. यावर आता प्रकाश टाकत विवेकने सत्य सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा पती अभिनेता विवेक दहियाने एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीसोबत संवाद साधताना सांगितले आहे की, ‘माझी बायको प्रेग्नेंट नाहीये.. दिव्यांका त्रिपाठी गर्भवती नाही.. असे काही घडले तर ही आनंदाची बातमी मी स्वतः चाहत्यांना सांगेन’. यावेळी बोलताना विवेक असेही म्हणाला कि, ‘मला समजत नाही की हे आमच्यासोबत का होत आहे..? आम्ही सोशल मीडियावर नेहमीच आमच्याबद्दल सांगत असतो. आमच्या आयुष्यात आनंद आला तर साहजिक आम्ही चाहत्यांना आधी सांगू’. ‘ये है मोहब्बतें’च्या सेटवर दिव्यांका आणि विवेक एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०१६ साली त्यांनी भोपाळमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला ६ वर्षे झाली असून दोघेही नेहमीच आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Tags: divyanka tripathiInstagram PostRumoures About PregnancyViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group