हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर हे कायमच नेहमीच चालू घडामोडी आणि ज्वलंत सामाजिक विषयांवर भाष्य करतात. यामुळे कितीतरी वेळा ते ट्रोल झाले पण थांबले नाहीत. एकेकाळी आपलं देशप्रेम त्यांनी अनोख्या पद्धतीने दर्शवलं होत. तेव्हाच एक प्रसंग स्वतः टिळेकरांनीच सांगितला आहे. यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त या किस्स्याची आठवण त्यांनी शेअर केली आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी त्यांनी ‘मराठी तारका’ सारखा कार्यक्रम केला होता आणि थेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन ‘भारत माता की जय’.., ‘जय हिंद’ अश्या घोषणादिल्या होत्या.
‘मराठी तारका’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून टिळेकरांनी थेट पाकिस्तान बॉर्डर गाठली आणि ‘जय हिंद – जय भारत’ सारख्या घोषणा दिल्या होत्या. या निधड्या अनुभवाविषयी ते म्हणाले कि, ‘पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रापासून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी आपले जवान जीवाची पर्वा न करता भारत पाकिस्तान बॉर्डर वर तैनात आहेत. बर्फात तर कधी रखरखत्या उन्हात प्रतिकूल परिस्थितीत ते शत्रूशी दोन हात करत असतात. त्यामुळे जवानांचा ताण घालवण्यासाठी विरंगुळा म्हणून मी कोणतेही मानधन न घेता अगदी प्रवास खर्चही न घेता त्यांच्यासाठी ‘मराठी तारका’चा कार्यक्रम करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने जवानांशी गप्पा,संवाद साधत एक वेगळी मैफल केली जाते.’
पुढे ते म्हणाले कि, ‘सियाचीन सारख्या ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी साडे सतरा हजार फूट उंचीवर जाऊन तिथे भारतीय जवानांचे मनोरंजन करणे तसे खूपच अवघड. पण हा प्रयोग आम्ही स्वीकारला आणि यशस्वी देखील केला आहे. त्यावेळी पाकिस्तानच्या बोर्डरवर जाऊन ‘भारत माता की जय’ ही घोषणा देणं हे अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय असा अनुभव देणारं ठरलं. शिवाय जवानांकडून मिळालेलं प्रेम हे आयुष्यात कधीही विसरता येण्यासारखं नाही. तो अनुभव तो दिवसच काही वेगळा होता’
Discussion about this post