हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘जय मल्हार’मधून अभिनेता देवदत्त नागे प्रकाश झोतात आला. याआधीही त्याने अनेक कामे केली होती. मात्र जय मल्हार मालिकेतील मुख्य भूमिकेने त्याला विशेष ओळख निर्माण करून दिली. देवदत्तचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे जो त्याला फॉलो करत असतो.
यामुळे आपल्या आयुष्यातील लहान सहान घडामोडी देखील अभिनेता आपल्या चाहत्यांसह शेअर करतो. काही तासांपूर्वी देवदत्तने सोशल मीडियावर आपल्याला दुखापत झाल्याची माहिती दिली आहे. हि पोस्ट पाहताच त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.
अभिनेता देवदत्त नागे हा गेल्या काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत राहिला आहे. या चित्रपटात तो हनुमान देवतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान तो कलर्स मराठी वाहिनीवरील चालू मालिका ‘जीव माझा गुंतला’मध्येदेखील एका महत्वाच्या भूमिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणात सध्या तो व्यस्त आहे.
याच मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली आणि यामध्ये त्याचा डोळा थोडक्यात बचावला आहे. या अपघाताची माहिती खुद्द देवदत्तनेच त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर दिली आहे. सोबतच झालेल्या दुखापतीचा फोटो देखील शेअर केला आहे, जेणेकरून चाहत्यांची चिंता मिटेल.
अभिनेता देवदत्त नागे याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्याला झालेल्या दुखापतीची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये त्याच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला दुखापत झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून आरामासाठी ब्रेक घ्यावा लागला आहे. या फोटोसह त्याने माहिती देताना लिहिले आहे कि, ‘आता काही दिवसांसाठी आराम. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान छोटी दुखापत झाली. देवाचे आभार की थोडक्यात डोळा वाचला.’ हि पोस्ट पाहून त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. आशा आहे कि लवकरच उत्तम स्वास्थ्यासह तो पुन्हा एकदा मनोरंजन करण्यास सज्ज होईल.
Discussion about this post