हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील एक काळ गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवी यांची जान्हवी कपूर हि सध्या इंडस्ट्रीमध्ये चांगलीच प्रकाश झोतात आली आहे. हॉट आणि बोल्ड जान्हवी तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतेच. पण गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. असं बोललं जात आहे कि, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत जान्हवीचं डेटिंग शेटींग सुरु आहे. या चर्चांदरम्यान जान्हवी कपूर पुन्हा तिच्या बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये स्पॉट झाली आहे.
जान्हवी कपूर डेटिंग करतेय अशी केवळ चर्चा होती. पण जेव्हापासून ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली आहे तेव्हापासून ती आणखीच प्रकाश झोतात आली आहे. जान्हवी डेट करत असलेला तो कोण..? तर हा तो म्हणजे शिखर पहाडिया. अलीकडेच जान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत एका पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ती करण जोहरच्या घरातून निघाली असताना दिसून आली. जान्हवी आणि शिखर कारमध्ये एकमेकांच्या बाजूला बसले होते. फोटोग्राफरला पाहताच तीने शिखरला सांगितले आणि त्याच्याशी हसत बोलू लागली.
करण जोहरच्या घरी जाताना जान्हवीने तपकिरी रंगाचा ड्रेस घातला होता. तसेच बेज रंगाचा कोटही घातला होता. डिसेंबर २०२२ मध्ये शिखर आणि जान्हवी दोघे एका कार्यक्रमात एकत्र दिसून आले होते. याशिवाय ते मुंबईत राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या एंगेजमेंटलाही पोहोचले होते. शिखर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. आता आगामी काळात लवकरच जान्हवी आणि शिखर यांच्या लग्नाचे सनई- चौघडे घुमणार आहेत.
Discussion about this post