Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Jr NTR’च्या सिनेमात जान्हवी कपूर झळकणार; वाढदिवशी शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 6, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
NTR 30
0
SHARES
32
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर आज तिचा २६ वा वाढदिवस साजरा करते आहे. आईच्या पावलावर पॉल ठेवत जान्हवी कपूरने अभिनय विश्वात पदार्पण केले आणि बॉलिवूड सिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची हक्काची एक जागा मिळवली. त्यामुळे आज तिचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. जो आज आपल्या लाडक्या अभिनेत्रींच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. अशातच जान्हवीने आपल्या चाहत्यांना रिटर्न गिफ्टमध्ये सरप्राईज दिलं आहे. हे सरप्राईज आहे नव्या सिनेमाची घोषणा. मुख्य म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून ती साऊथ सिनेविश्वात पदार्पण करतेय. या चित्रपटाचे नाव NTR 30 असून यामध्ये जुनिअर एनटीआरसोबत जान्हवी दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जान्हवी कपूरनं तिच्या आगामी साऊथ सिनेमाची घोषणा केली आहे. सोबतच जान्हवीने तिच्या या आगामी सिनेमाचं पोस्टरदेखील प्रदर्शित केलं आहे. त्यामुळे आता बॉलिवूडनंतर जान्हवी थेट टॉलिवूड गाजवणार यात काही शंकाच नाही. माहितीनुसार, या सिनेमात जान्हवी RRR फेम लोकप्रिय साऊथ अभिनेता Jr NTR सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमात जान्हवी कपूर आणि Jr Ntr यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून Jr NTR’च्या बहुप्रतिक्षित NTR 30 या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवाय या सिनेमात मुख्य अभिनेत्री कोण असेल याबाबत मोठी चर्चा सुरु होती. याचा अखेर उलघडा होत जान्हवी कपूरच्या भूमिकेचे पोस्टर रिलीज झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Jr NTR (@jrntr)

हे पोस्टर जान्हवीने शेअर केले असून या पोस्टवर ज्युनिअर एनटीआरने कमेंट करत लिहिलंय कि, ‘जान्हवी तुझे ऑनबोर्ड स्वागत आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… तुझा वाढदिवस खूप चांगला जावो!’ कोरतला शिवा दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा NTR 30 या सिनेमामधून जान्हवी कपूर थेट साऊथ सिने इंडस्ट्रीत पदार्पण करतेय. निर्मात्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले की, धडक फेम अभिनेत्री NTR 30 मध्ये जूनियर एनटीआरसोबत रोमान्स करण्यासाठी सज्ज आहे. सोबतच जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त या सिनेमातील तिच्या भूमिकेचे एक सुंदर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, या सिनेमात Jr NTR आणि जान्हवी कपूरसोबतच अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. येत्या १८ मार्च २०२३ पासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Tags: Instagram Postjanhavi kapoorJr.NTRNew Upcoming MoviePoster ReleasedViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group