Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विकी- साराच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती; पहिल्याच दिवशी ‘जरा हटके जरा बचके’ची कोट्यवधींची कमाई

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 3, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Zara Hatke Zara Bachke
0
SHARES
210
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट शुक्रवारी २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये पहिल्यांदाच विकी कौशल आणि सारा अली खान हि फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मुख्य म्हणजे या जोडीने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांवर जादू केली आहे. चित्रपटातील कलाकारांनी प्रमोशनसाठी स्वतःला झोकून दिलं आहे आणि दुसरीकडे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केल्याचे समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी विकी आणि साराच्या जोडीला पसंती दर्शवत पहिल्याचं दिवशी चित्रपटाला मोठी कमाई करून दिली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सादर केलेल्या रिपोर्टनुसार, विकी आणि साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याचं दिवशी तब्बल ५.४९ कोटींची कमाई केली आहे. तर या वीकेंडला चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

View this post on Instagram

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा एकत्र असा हा पहिलाचं चित्रपट असूनही प्रेक्षकांनी याला पसंती दिली आहे. मुळात या जोडीला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याविषयी आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे साहजिकच या चित्रपटाच्या रिलीजनंतर प्रेक्षकांनी आवर्जून चित्रपट पाहिला आहे.

अजूनही येत्या काही दिवसात हा चित्रपट आणखी चांगली कमाई करेल असे बोलले जात आहे. निर्मात्यांनी चित्रपटाकडे प्रेक्षकांचा कल वाढविण्यासाठी रिलीझआधी संध्याकाळी बाय वन गेट वन तिकीटची ऑफर केल्यामुळे तिकीटांच्या विक्रित वाढ झाली. ज्यामुळे पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसने पहिल्याच दिवशी जवळपास ३.१५ कोटी रुपयांची कमाई केली. एकंदरच काय तर निर्मात्यांची शक्कल कामाला आली म्हणायची.

Tags: collectionnew movie bollywoodSara Ali KhanVicky KaushalViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group