नवी दिल्ली । सेलेब्रिटी म्हटलं कि त्यांच्या मागे पुढे ढीगभर फोटोग्राफर आलेच. सेलेब्रिटी कुठेही गेले तरी त्यांचे चाहते अन मीडिया त्यांचा पिछा सोडत नाही हे खरी. आपल्याला हे पाहताना खूप ग्लॅमरस वाटतं पण प्रत्यक्षात सेलेब्रिटी मात्र यामुळे कधी कधी वैतागून जातात. आता अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्याबाबतीतही असाच एक किस्सा घडला आहे.
अभिनेत्री जया बच्चन नुकत्याच आपली नात नव्या नंदा (Navya Nanda) हिच्यासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाल्या. यावेळी त्यांना पाहून अनेक फोटोग्राफर्स (Photographer) त्यांचे फोटो व्हिडीओ काढण्यासाठी पुढे मागे धावू लागले. यावर जया बच्चन काहीशा चिडल्या अन तुम्ही लोक कोण आहात? असा प्रश्न त्यांनी फोटो काढणार्यांना विचारला. आप कौन से मीडियासे हो? असं विचारत त्यांनी तुमच्या न्युजपेपरचं नाव काय असा प्रश्न केला.
यावर फोटो काढणाऱ्या तरुणांनी ते ज्या फोटोग्राफर्सकरता काम करतात त्या मोठ्या फोटोग्राफर्सची नावे घेतली. मात्र जया बच्चन कोणाचंच काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. जया बच्चन यांचा राग पाहून शेवटी त्यांची नात नव्या हिना त्यांना शांत केलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
Discussion about this post