हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप आणि राजकारणाने वेगळं वळण घेतलं आहे. या प्रकरणात बिहार आणि महाराष्ट्र पोलीस आणि राजकीय नेत्यांमध्ये वादाला सुरुवात झालीय. बिहरमधल्या सत्ताधारी जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. या प्रकरणामागे असलेले माफिया हे रिया चक्रवर्तीची हत्या करू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पाटण्यात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
रंजन म्हणाले, या आधी सुशांतची मॅनेजर दिशा सालयानचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला नाही. आता या प्रकरणी रियाच एकमेव साक्षिदार असून तिच्या जबाबाला महत्त्व आहे. या प्रकरणामागे असलेले माफिया आता रियाची हत्या करू शकतात अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीय. रियाने कोर्टात जाऊन आपला जबाब नोंदवला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी मुंबईत चौकशी करणाऱ्या बिहार पोलिसांना कागदपत्र देणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकरणी सरकारने ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेतला होता. त्यानंतर बिहार पोलिसांना हा नकार कळविण्यात आला आहे. त्यामुळे आता बिहार पोलीस कुठलं पाऊल उचलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नियमानुसार या प्रकरणात बिहार पोलिसांना चौकशी करण्याचा अधिकारच नाही असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे. जर बिहार पोलिसांकडे तक्रार आली असल्यास ती त्यांनी मुंबई पोलिसांना द्यायला पाहिजे असं मत ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केलं होतं. हा सल्ला आल्यानंतर राज्य सरकारने बिहारला आपला नकार कळवला आहे.