Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘झिम्मा’ची दणक्यात शंभरी पूर्ण; सिनेमागृहात 15 आठवड्यांची गौरवास्पद कामगिरी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Zimma
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना महामारीमूळे सर्वत्र राज्यात लॉकडाऊन सुरु होता. परिणामी चित्रपटसृष्टीला याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यानंतर कोरोनाचा कहर कमी होताच चित्रपटगृहे ५०% क्षमतेने खुली झाली आणि ‘झिम्मा’ चित्रपटाची चित्रपटगृहात धमाकेदार एंट्री झाली. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपटाने आता १५ आठवडे सलग चित्रपटगृहे गाजवली आहेत. नुकतेच या चित्रपटाने यशस्वी १०० दिवस पूर्ण केले आहेत. झिम्मा’च्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाने अशी गौरवास्पद कामगिरी केली आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या कठीण काळातही चित्रपटगृहात पदार्पण करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा झिम्मा हा खरोखरीच कौतुकास्पद चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत १५ करोडची कमाई करणारा हा चित्रपट ब्लॉकबस्टर असून अजूनही थिएटर गाजवतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

नुकताच झिम्मा चित्रपटाने १५ व्या आठवड्यात पॉल टाकलं आहे. यानंतर अजूनही पुढे काही काळ ‘झिम्मा’ची जोरदार घौडदौड सुरु राहील असे समीक्षकांचे म्हणणे आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ काही दिवसांपूर्वीच अॅमेझॅानवर प्रदर्शित झाला असतानाही चित्रपटगृहात जाऊन ‘झिम्मा’ पाहणारा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. म्हणूनच ‘झिम्मा’ चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवण्यात आलाय. मुख्य म्हणजे, ॲमेझॉन प्राईमवर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये ‘झिम्मा’ चित्रपटाने स्थान मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

अशा रेकॉर्डब्रेक कामगिरीनंतर निर्माती आणि अभिनेत्री क्षिती जोग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान क्षिती म्हणाल्या कि, “लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटांचे काय होणार, अशी नकारात्मक चर्चा सुरू असताना ‘झिम्मा’ प्रदर्शित करण्याचे धाडस आम्ही केले. आजही चित्रपटगृहांमध्ये ‘झिम्मा’ची यशस्वी घोडदौड सुरू असून शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. मुख्य बाब म्हणजे हा चित्रपट लॉकडाऊनच्या नंतर चित्रपटगृहांची दारे उघडणारा चित्रपट ठरला आहे. बॅालिवूड हॅालीवुडचे मोठे चित्रपट शर्यतीत असतानाही तीन महिन्यांहून आधिक काळ ‘झिम्मा’ने चित्रपटगृहांमध्ये टिकून राहणे नक्कीच अभिमानास्पद आहे. सोशल मिडीयावरही ‘झिम्मा’च्या लोकप्रियतेबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे. त्याबद्दल माझ्या संपुर्ण टिमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

झिम्मा हा चित्रपट अत्यंत बहुरंगी आहे. इंग्लंडला फिरायला निघालेल्या सात वेगवेगळ्या स्त्रियांचा हा प्रवास अतिशय रंजक मात्र कधी भावनिक तर कधी हटके आहे. या चित्रपटात दंगा करणाऱ्या या सात महिला म्हणून सुहास जोशी, निर्मिती सावंत, सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या महिला कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर सहाय्यक भूमिकांमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे यांनी अव्वल जबाबदारी पेलली आहे. ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक, धमाल, मस्ती, मजेचा अनुभव देणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल पॅकेज असा एक कौटुंबिक सिनेमा आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही पहिला नसेल तर नक्की पहा.

Tags: Hemant DhomeInstagram PostKshiti JogMrunmayee GodboleNirmiti sawantSayali SanjivSiddharth Chandekarsonalee kulkarniSuccessful 100 daysSuchitra BandekarSuhas JoshiZimma
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group