हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच अत्यंत गाजलेले प्रकरण म्हणजे अभिनेते किरण माने यांची मालिकेतून केलेली हकालपट्टी. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील नामक भूमिका माने साकारत होते. त्यांच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता असतानाही त्यांना मालिकेतून थेट बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. दरम्यान त्यांना कोणतेही कारण वा नोटीस न देता हि कारवाई करण्यात आल्यामुळे हे प्रकरण चांगलेच पेटले. दरम्यान आपण राजकीय भूमिका घेत असल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याने माने यांनी सांगितले होते. दरम्यान प्रोडक्शन आणि चॅनेलकडून मानेंवर महिला सह कलाकारांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. दरम्यान मानेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती. यानंतर आव्हाडांनी आज असा पुरावा सादर केला आहे जो पाहून अनेकांचे डोळे मोठे होतील.
इतक खोटं करायचं कि ते उघड नागड होऊन समोर येत. म्हणजे याचा अर्थ किरण माने चुकलेला नाही. pic.twitter.com/rEwE9ypSmD
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 24, 2022
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दोन ट्विट केले आहेत. यातील एका ट्विटमध्ये लिहिले कि, किरण मानेला प्रोडक्शन हाऊसने कुठल्याही प्रकारचे लेखी समजपत्र असे काहीही दिलेले नव्हते. हे मी स्टार प्रवाहला बोलून दाखवल्यानंतर आज किरण मानेला एक पत्र रजिस्टर पोस्टाने आलं. त्याच्यावरती रजिस्टर पोस्ट केल्याची तारीख 21 आहे आणि पत्र लिहिण्याची तारीख 13 आहे. याशिवाय आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आव्हाडांनी मानेंना आलेल्या पत्राचे फोटो पुरावा म्हणून पोस्ट केले आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये हे फोटो पोस्ट करीत लिहिले कि, इतक खोटं करायचं कि ते उघड नागड होऊन समोर येत. म्हणजे याचा अर्थ किरण माने चुकलेला नाही.
दरम्यान, मालिकेतून बाहेर काढल्यानंतर किरण माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा माध्यमांशी बोलताना माने यांनी सांगितले होते कि, शरद पवार साहेब आपल्याला न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने किरण माने यांना पाठिंबा दिला आहे. त्यात आता समोर आलेल्या पुराव्यानुसार पॅनोरामा स्टुडिओ आणि स्टार प्रवाह वाहिनी चांगलेच अडचणीत येणार असे स्पष्ट दिसून येत आहे.
Discussion about this post