हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता जितेंद्र जोशीने केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध नाटकं, मालिका, चित्रपट आणि दमदार वेब सीरिजच्या माध्यमातून जितेंद्र जोशी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. आपल्या कामात व्यस्त असताना अनेकदा त्याला कुटुंबासोबत वेळ घालवता आलेला नाही. मात्र यावेळी जितू वेळात वेळ काढून आपल्या लेकीसह लंडन दौऱ्यावर गेला आहे. लेकीसोबतच्या या आंतरराष्ट्रीय ट्रिपबाबत त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याचे कॅप्शन अत्यंत भावनिक आहे.
अभिनेता जितेंद्र जोशी त्याची लेक रेवासोबत सध्या परदेश वारी करतो आहे. जितेंद्र आणि रेवा लंडन फिरायला गेले आहेत. या ट्रिप दरम्यानचा एक व्हिडीओ जितेंद्रने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रेवा खूप आनंदी दिसतेय. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये जितेंद्रने लिहिलंय कि, ‘रेवा १३ महिन्यांची असताना आम्ही पहिल्यांदा ट्रिपला गेलो होतो. आता लवकरच ती १३ वर्षांची होणार आहे…. माझ्याबरोबर तिची ही पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप… यासाठी खास आम्ही मिस्टर शेक्सपियरच्या देशात आलोय, मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो आणि हे सगळे माझ्या बायकोमुळे शक्य झाले’.
जितूने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर त्याचे मनोरंजन विश्वातील मित्र मंडळी, चाहते तसेच अन्य नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. यावर अभिनेता स्वप्नील जोशीने कमेंट करत लिहिलंय कि, ‘शेक्सपिअरची काव्यमय भूमी तुझ्या बाजूने आहे.. देव तिला सुखात ठेवो.. खूप सुंदर.. लव्ह यू’. तर रितेश देशमुखने लिहिलंय, ‘आज मी पाहिलेला सर्वात गोड व्हिडीओ… खूप सुंदर रेवा’. तसेच अभिनेत्री अमृता सुभाषने म्हटले आहे कि, ‘रेवा आनंदी आहे हे पाहून मला खरंच छान वाटलं, जीतू… तू खूप चांगला बाप आहेस’.
अभिनेता संतोष जुवेकरने म्हटले आहे कि, ‘मलाच कसलं भारी वाटलंय रेऊला आणि तिचे expression बघून’. इतकंच काय तर, बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनीदेखील कमेंट करत म्हटले आहे कि, ‘हा व्हिडीओ मला खूप आवडला जीतू’. याशिवाय अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, स्पृहा जोशी, सारंग साठ्ये, मेघना ऐरंडे, क्रांती रेडकर, प्रियदर्शन जाधव, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, अभिजित खांडकेकर आणि अजून अनेक कलाकार मंडळींनी या व्हिडिओवर कमेंट करत जितूचे एक पिता म्हणून कौतुक करत रेवाला प्रेममय संदेश दिले आहेत.
Discussion about this post