Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘..आणि तिथेच मला निशिकांत सापडला’; सर्वोत्तम कलाकृती ‘गोदावरी’ प्रदर्शनास सज्ज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Godavari
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याचा ‘गोदावरी’ हा चित्रपट बरंच काही बोलून गेला आणि बरंच काही सांगून गेला. या चित्रपटाने बघता बघता अशा काही नामांकित पुरस्कारांवर नाव कोरले कि बस्स. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर परराष्ट्रातही आपला डंका वाजवला. मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा हा चित्रपट अखेर आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे लवकरच प्रेक्षक हा चित्रपट सिनेमा गृहात जाऊन पाहू शकतात आणि निशिकांतची ‘ती’ अवस्था अनुभवू शकतात. माहितीनुसार हा चित्रपट याच वर्षात येत्या ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हेच सांगताना जितेंद्र जोशीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

हि पोस्ट शेअर करताना जितेंद्र जोशी म्हणतो कि, ‘जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो. त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं आणि तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो आणि तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मला त्याची आठवण येत आहे.’ गोदावरी नदीच्या काठी हा व्हिडीओ शूट केला असून यात जितेंद्रने त्याचा दिवंगत मित्र आणि प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत यांना त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

‘गोदावरी’ हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा फार वेगळी कलाकृती आहे. यामध्ये जो निशिकांत आहे तो तुमच्या आमच्यात कुठेतरी अंशभर का होईना आहेच. त्यामुळे हि कथा आपली वाटते. निशिकांत एक असा माणूस आहे जो आपल्या कुटुंबापासून फार म्हणजे फार दूर भटकला आहे. तो सध्या अगदी अस्तित्वहीन आयुष्य जगतो आहे आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या क्षणात त्याला अनेक प्रश्न पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरे त्याच्या आयुष्याची उकल आहे. याच प्रश्नांची उत्तरं त्याला त्याने इतकी वर्ष तिरस्कार केलेल्या ‘गोदावरी’ नदीजवळ मिळतात.

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित ‘गोदावरी’ या चित्रपटात जितेंद्र जोशीची मुख्य भूमिका आहे. तर विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव हे अन्य कलाकार आहेत. आत्तापर्यंत गोदावरीला अनेक भारतीय आणि जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये ओपनिंग फिल्म
IFFI 2021 मध्ये जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मध्ये, निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार
एवी प्रफुल्ल चंद्रा यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार

Tags: Award Winning FilmGodavariJitendra JoshiMarathi MovieRelease Date
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group