हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रसिक प्रेक्षकांना जागतिक दर्जाच्या चित्रपटांची मेजवानी देणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदाच्या वर्षी २ ते ९ फेब्रुवारी २०२३ या काळात संपन्न होत आहे. या चित्रपट महोत्सवाचं हे २१ वं वर्ष आहे. गुरुवारी, २ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी थिएटर अकादमी, सकल ललित कलाघर, मुकुंदनगर येथे महोत्सवाचा उदघाटन समारंभ झाला. यंदाचा पिफ थोडा वेगळा आहे. कारण यावेळी केवळ चित्रपटांची मेजवानीच नाही तर कार्यशाळा देखील आहेत. या महोत्सवात जॉनी लिव्हर आणि विद्या बालन हे विशेष आकर्षण ठरणार आहेत आहेत.
महोत्सवात चित्रपटांसह व्याख्यानं आणि काही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये ए श्रीकर प्रसाद, चैतन्य ताम्हाणे, शाजी करून, राहुल रवैल, जॉनी लिव्हर आणि विद्या बालन विविध विषयांवर आपले मत मांडणार आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीत यंदाचा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल दिमाखात पार पडणार आहे. या सगळ्या चर्चासत्र आणि व्याख्यानांचा चित्रपट प्रेमींना आणि रसिकांना चांगला फायदा होईल अशी आशा आहे. चित्रपट महोत्सवाची सुरुवात इराणी चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास यांच्या होली स्पायडर या चित्रपटाने झाली. डेन्मार्क, स्वीडन, जर्मनी या युरोपीय देशांत या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. तर मिशेल हजानाविसीयस दिगदर्शित कुपे (फायनल कट) हा फ्रेंच चित्रपट या कार्यक्रमाच्या समारोपाचा चित्रपट असेल.
० चर्चासत्र आणि व्याख्याने
> दिनांक – ३ फेब्रुवारी २०२३ ,
वार – शुक्रवार
वेळ – दुपारी ३:३० वाजता
व्याख्यानकर्ते – ए श्रीकर प्रसाद
विषय – ‘दी इंव्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग’
> दिनांक – ४ फेब्रुवारी २०२३
वार – शनिवार
वेळ – सायंकाळी ५:३० वाजता
व्याख्यानकर्ते – चैतन्य ताम्हाणे
विषय – विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’
> दिनांक – ५ फेब्रुवारी २०२३
वार – रविवार
वेळ – दुपारी ३:३० वाजता
व्याख्यानकर्ते – दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर शाजी करून
विषय – ‘थिंकिंग इमेजेस’
> दिनांक – ६ फेब्रुवारी २०२३ रोजी
वार – सोमवार
वेळ – दुपारी ३:३० वाजता
व्याख्यानकर्ते – ‘अर्जुन पंडित’, ‘और प्यार हो गया’, ‘अंजाम’, ‘जो बोले सो निहाल’ यांसारख्या चित्रपटांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल
विषय – ‘मेनस्ट्रीम सिनेमा टूडे’.
> दिनांक – ७ फेब्रुवारी २०२३ रोजी
वार – मंगळवार
वेळ – दुपारी ३:३० वाजता
व्याख्यानकर्ते – सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर
विषय – ‘ह्युमर इन सिनेमा’
> दिनांक – ८ फेब्रुवारी २०२३ रोजी
वार – बुधवार
वेळ – दुपारी ३:३० वाजता
व्याख्यानकर्ते – ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे व टाटा इन्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ मिडीया अँड कल्चरल स्टडीज विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. लक्ष्मी लिंगम
विषय – ‘मेकिंग फिल्म्स अँड वॉचिंग फिल्म्स: जेंडर इन हिंदी सिनेमा’
> यानंतर सायंकाळी ४:३० वाजता सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ‘चॅलेंजेस ऑफ फिमेल अॅक्टर्स इन दी एन्टरटेन्मेट वर्ल्ड’ या विषयावर मत प्रदर्शन करेल.
Discussion about this post