Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेनाचे हिंदी कलाविश्वात पदार्पण; ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 31, 2023
in TV Show, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rishi saxena
0
SHARES
229
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली होती. या मालिकेने २०१६ साली छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मन जिंकले होते. मालिका संपूर्ण बराच काळ लोटला असला तरीही मालिकेतील मुख्य पात्र अर्थात शिव आणि गौरी यांची जोडी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शिव हि भूमिकेत अभिनेता ऋषी सक्सेना तर गौरी हि भूमिका मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने साकारली होती. यानंतर सायली आणि ऋषी दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर आता ऋषी सक्सेना थेट हिंदी कलाविश्वात पदार्पण करत असल्याचे समोर आले आहे आणि यामुळे त्याचे चाहते त्याला नव्या भूमिकेत पहायला उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official)

‘काहे दिया परदेस’ या मालिकेमध्ये शिव हे पात्र साकारुन ऋषी सक्सेना घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचला. या मालिकेने त्याला प्रकाशझोतात आणत लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेनंतर ऋषीने विविध चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘रेनबो’ या चित्रपटांमध्ये ऋषी महत्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसला आहे. यानंतर मात्र आता ऋषी सक्सेना पुन्हा एकदा मालिका विश्वाकडे वळला आहे. मात्र यावेळी मराठी नव्हे तर हिंदी कलाविश्वातून तो प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. त्याच्या आगामी मालिकेचा प्रोमो अलीकडेच प्रदर्शित झाला असून चांगलाच चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official)

कलर्स हिंदी वाहिनीवरील ‘सावी की सवारी’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता ऋषी सक्सेना हा हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करतो आहे. मुख्य म्हणजे या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मालिकेतील मानव हे पात्र तो साकारणार आहे. ऋषीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवरुन या मालिकेचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी मित्र मंडळी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. बऱ्याच दिवसांनी तो मालिका विश्वात कमबॅक करत असल्यामुळे या भूमिकेबाबत तो स्वतःसुद्धा प्रेक्षकांइतकाच उत्सुक आहे.

Tags: Colors TVInstagram PostPromo VideoRishi Saxenatv serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group