हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुद्दा कुठलाही असो आणि कुणाचाही असो कंगना त्यावर बोलली नाही असं कधी झालच नाही. मग काय कंगना बोलणार म्हणजे पुन्हा एकदा ट्रोलिंग आणि वाढ ओढून घेणार. बॉलीवूडवर नेम साधणारी कधी राजकारण्यांची शाळा घेणारी तर ट्विटरच्या धोरणांवर रोज नवे प्रश्नचिन्ह उभे करणारी कंगना आता इंस्टाग्रामवर चांगलीच पेटली आहे. खरतर फक्त इन्स्टाग्रामवर नाही तर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित युजर्सच्या विचारशक्तीबाबत तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. इन्स्टाग्राम हा कम्युनिस्ट आणि जिहादींचा अड्डा बनत असल्याचा आरोप करत, आगामी निवडणुकीत भाजपासाठी धोका होऊ लागल्याचा दावा तिने केला आहे. कंगनाने ट्विटरवर असे लागोपाठ दोन ट्विट केले आहेत.
https://twitter.com/KanganaTeam/status/1386681926396825601
कंगनाची तिच्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, इन्स्टाग्रामवर डम्ब आणि मूर्ख लोकांचा भरणा आहे. या ठिकाणी उपस्थित लोकांमध्ये आयक्यु नसणे असहनीय आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये केवळ एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे येथे लहान बिझनेसला चालना मिळते. पण आता विरोधक याचा वापर स्वत:साठी करत आहेत. पाश्चिमात्यांची जीवनशैली प्रमोट करत, हे लोक भाजपाविरोधात द्वेष पसरवत आहेत.
https://twitter.com/KanganaTeam/status/1386683624481775618
तर दुसऱ्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले कि, ‘इन्स्टाग्राम म्हणजे मिडलक्लास लोकांचे टिकटॉक आहे. या मूर्खांना धनाढ्यांनी, कम्युनिस्टांनी आणि जिहादींनी हायजॅक केले आहे. ही २०२४ च्या निवडणुकीत भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. जे जोकर फॅशनच्या नावावर शर्टखाली सायकलिंग शॉर्ट घालू शकतात, त्यांच्या मेंदूत काहीही पेरले जाऊ शकते’. याआधी कंगनाने ट्विटरच्या धोरणांवर असेच तोंड सोडले होते. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्जी यांना टॅग करत, तुम्ही इस्लामी देश आणि चीनी धोरणांसाठी विकले गेले आहात. तुम्ही केवळ स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहात, असे तिने म्हटले होते.
Discussion about this post