हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अभिनयापेक्षा वादग्रस्त विधाने करण्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली धाकड अभिनेत्री म्हणजेच कंगना रनौत यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून कंगना भाजपची वाहवाह आणि त्यांच्या नेत्यांची बढाई करताना दमत नसल्याचे दिसून आले आहे. सोबतच काँग्रेसवर शिंथोडे उडविण्याची एकही संधी ती सोडत नाही. दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना तिने राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहे. यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक आता कंगना लढवणार अशी चर्चा सुरु आहे. यावर प्रकाश टाकत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Kangana Ranaut wishes to contest 2024 Lok Sabha elections from Himachal Pradesh for BJP. pic.twitter.com/VcyV5z2WBv
— Blue Sattai Maran (@tamiltalkies) October 31, 2022
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना कंगनाला भाजपमध्ये स्थान असू शकते का…? या प्रश्नाचे उत्तर देत काही मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य केले आहे. ते म्हणाले कि, ‘होय, तिला स्थान आहे. पण कोणत्या जबाबदारीवर काम करायचे, हे पक्ष ठरवतो. कंगनाचे स्वागत आहे. अशा प्रकारे आम्ही सर्वांना पक्षात घेतो. कोणालाही अटी लादून सामील करून घेतले जात नाही. पक्षात कोणी आले तरी त्याला नेहमी सांगितले जाते की, तुम्हाला कोणत्याही अटीशिवाय यावे लागेल, त्यानंतर पक्ष जबाबदारी निश्चित करेल.’
The only Actress know’s the pain of Uttarakhand & Himachal! How beautifully she explained abt why we Pahadi’s don’t like Dams & Deforestation.
Each state in India have it’s own features. Similarly pahadi areas can’t be good in the hood of Urban or City ideology.
#KanganaRanaut pic.twitter.com/W7TDWmySWT— Siddhant🖤 (@slay_sagar) October 29, 2022
अलीकडेच अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली होती कि, तिला लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात यायचे आहे. त्यासाठी ती तयार आहे. कंगनाने बोलताना पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. तर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर ताशेरेही ओढले. दरम्यान ती म्हणाली होती की, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात स्पर्धा नाही. त्यांची तुलनाही करू नये. तसेच अरविंद केजरीवाल यांची टर् उडवत कंगना म्हणाली कि, हिमाचलच्या लोकांना मोफत वीज नको आहे. येथील लोक स्वतःची वीज बनवतात. यानंतर राजकारणात येण्याबाबत बोलताना कंगना म्हणाली, ‘परिस्थिती कशीही असेल, सरकारला माझा सहभाग हवा असेल, मग मी तो देईन आणि मी माझ्या सहभागासाठी तयार आहे. तसेच हिमाचल प्रदेशच्या लोकांनी मला सेवेची संधी दिली तर ती नक्कीच भाग्याची गोष्ट असेल, असेही ती म्हणाली.
Discussion about this post