Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ अभिनेत्यावर चक्क कंगनाने केला कौतुकाचा वर्षाव; नेटकरीही चक्रावले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड सिनेसृष्टीत स्पष्ट आणि बेधडक बोलण्यासाठी अनेक कलाकार प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे धाकड बाॅलीवूड क्वीन कंगना रनौत. एखाद्याची पिस काढायची असतील तर कंगना नेहमी पुढे असते. मग मनोरंजन सृष्टीतलं कुणी असो किंवा मग राजकारणाशी संबंधित व्यक्ती. चांगल बोलण कमी आणि झाडण जास्त तिच्या बोलण्यात असत. पण यावेळी एक अजब गोष्ट घडली आहे. कंगना नेहमी कुणाला तरी शहाणपण शिकवताना दिसते किंवा मग नकारात्मक टिप्पणी करताना. पण यावेळी मात्र तिने चक्क एका बॉलिवूड अभिनेत्याचे कौतुक केले आहे. हा अभिनेता म्हणजे बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील कुल हिरो दिग्गज अभिनेता धर्मेंद्र देओल.

Dharmendra

तसे मागील काही काळापासून कंगना अनेक बाॅलीवूड सेलिब्रिटींबद्दल चांगल आणि सकारात्मक बोलताना दिसतेय. दरम्यान आता कंगना अभिनेता धर्मेंद्र यांच्याविषयी सकारात्मक बोलली आहे तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने चक्क कौतुक केलंय. वास्तविक इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने धर्मेंद्र यांचा एक अतिशय जुना फोटो शेअर केला आहे. सोबतच तिने लिहिलं आहे की, धर्मेंद्रजी यांच्या सौंदर्यावर एक कौतुकपर पोस्ट.

तसे पाहता आता वयोमानामुळे धर्मेंद्र काही काळापासून मोठ्या पडद्यावर दिसत नाहीत. ते शेवटी २०२० साली प्रदर्शित शिमला मिर्च या चित्रपटात दिसले होते. यात ते पत्नी हेमा मालिनीसोबत दिसले होते. यानंतर आता लवकरच सनी देओल आणि बाॅबी देओलसह धर्मेंद्र पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. मुख्य म्हणजे या आगामी चित्रपटात सनी देओलचा मुलगा करण देओल देखील अभिनय करताना दिसणार आहे. या व्यतिरिक्त धर्मेंद्र ‘राॅकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातदेखील दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट, शबाना आझमी आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.

Tags: Bollywood ActorsdharmendraInsta StoryKangana Ranautviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group