हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. दोन मुखावटाधाऱ्यांनी त्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकले आणि पळून गेले. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात या मुलीवर आयसीयूत उपचार सुरु आहेत. हल्लेकरांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. अशातच बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. कंगनाची बहिण रंगोली चंदेलवरदेखील असाच हल्ला झाला होता आणि या घटनेतून तिचे कुटुंब फार मोठ्या संघर्षाला सामोरे गेले होते. याविषयी तिने हि पोस्ट शेअर करत स्वतःची एक भीती व्यक्त केली आहे.
अभिनेत्री कंगना रनौतने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत स्वतःच्या कुटुंबावर ओढवलेल्या प्रसंगाची वाच्यता केली आहे. कंगना आपल्या स्टोरी पोस्टमध्ये म्हणाली आहे कि, ‘माझी बहिण रंगोलीवर झालेला तो हल्ला अजुनही मला विषण्ण करतो. मी खूप शोकात बुडाले होते. रंगोलीला त्या हल्ल्यानंतर तब्बल ५२ सर्जरीमधून जावे लागले होते. तिच्या मानसिक आणि शारीरिक गोष्टींच्या संयमाला मानावे लागेल. रंगोलीनं त्या दरम्यान जे काही सहन केले त्याला तोड नाही.
पुढे लिहिलंय, ‘मात्र हे जे कुणी करते त्यांना तातडीनं शिक्षा व्हावी असे माझे म्हणणे आहे. माझे संपूर्ण कुटूंब उद्धवस्त झाले होते. त्यावेळी मला देखील मोठया मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. आता मला देखील भीती वाटू लागली आहे ती म्हणजे माझ्यावर देखील कुणी अॅसिड अॅटक केला तर…मी काय करु शकते, जेव्हा कुणी एखादा माझ्या जवळून जातो तेव्हा मलाही माझा चेहरा झाकून घ्यावसा वाटतो. त्या गोष्टी पुन्हा आठवू लागतात. असे कंगनानं सांगितले आहे.’
Discussion about this post