हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची धाकड गर्ल अर्थात अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या परखड आणि स्पष्ट मत प्रदर्शनासाठी चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे कंगना विविध पोस्ट शेअर करत नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधत असते. कधी वादग्रस्त विधाने तर कधी परखड मत, इतकंच काय तर कधी थेट मुद्द्याला हात घालून चिरफाड करायला देखील ती मागे हटत नाही. सध्या कंगनाने तिचा मोर्चा तरुण पिढीकडे वळवला आहे आणि त्यांच्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. साल १९९७ ते २०१२ मध्ये जन्मेलेल्या पिढीतील मुलांना सध्या ‘जेन झी’ असं संबोधलं जातं.याविषयी बोलताना तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री कंगनाने आपल्या पोस्टमध्ये, या पिढीतील मुलांच्या जीवनशैलीबद्दल आणि त्यांच्या आयुष्याकडे बघायच्या दृष्टीकोनाबद्दल तिचे मत मांडले आहे. तिच्या मान्यतेनुसार, या पिढीतील मुलं प्रत्येक बाबतीत आळशी आहेत. ज्याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘जेन झी… या लोकांचे हातपाय काड्यांप्रमाणे कमकुवत झाले आहेत. लोकांशी संभाषण, निरीक्षण तसेच वाचन यापेक्षा ही मुलं त्यांचा सर्वाधिक वेळ त्यांच्या स्मार्टफोनवर घालवतात’.
यापुढे बोलताना कंगना म्हणाली कि, ‘या मुलांना समोरच्या व्यक्तीला सन्मान देणं कधीच जमत नाही, या मुलांना फक्त लवकरात लवकर यशस्वी व्हायचं आहे त्यासाठी त्यांना स्वतःला शिस्त लावायची नाहीये, त्यांना सगळं पटकन हवं आहे. जेन झी मुलांना स्टारबक्स आणि अवोकाडो टोस्ट प्रचंड आवडतं पण आजच्या जमान्यात त्यांना स्वतःचं घर घेणं शक्य नाही. त्यांना ऊंची ब्रॅंडेड कपडे परिधान करायला आवडतात. पण नाती टिकवण्यासाठी एखाद्याशी प्रामाणिक राहणं त्यांना जमत नाही. शिवाय काही रीपोर्टनुसार सेक्समध्येसुद्धा ही मुलं खुपचं आळशी आहेत. या मुलांच्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवणं किंवा त्यांचा ब्रेन वॉश करणं हे अत्यंत सोप्पं आहे’.
Discussion about this post