Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आले माफिया पप्पू.. बचावासाठी..; आर्यन खानला पाठिंबा देणाऱ्या बॉलिवूडकरांवर कंगनाचा हल्लाबोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 7, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या NCB च्या कस्टडीत आहे. क्रूझवरील रेव्ह पार्टीत त्याच्याकडे ड्रग्ज सापडल्याने हि कारवाई करण्यात आली असून यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्या समर्थनार्थ अख्खा बॉलिवूड समाज उभा राहिल्याचे दिसले. पण यातही काही असे आहेत ज्यांना हे समर्थन रुचलेलं नाही. नुकतीच हृतिक रोशनने आर्यनसाठी लांबलचक पोस्ट लिहिली आहे. यानंतर कंगनाने मात्र या समर्थनाचा फडशाच पाडला. तिने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आर्यन खानच्या समर्थकांवर निशाणा साधला आहे.

View this post on Instagram

A post shared by StoriesViews (@storiesviewscom)

 

या स्टोरीमध्ये कंगनाने लिहिले कि, ‘आता सर्व माफिया पप्पू आर्यन खानच्या बचावासाठी पुढे येत आहेत. आपण चुका करतो पण आपण त्याचा गौरव करू नये. मला खात्री आहे की यामुळे त्याला परिणामांची जाणीव होईल. जेव्हा कोणी संवेदनशील परिस्थितीतून जात असेल तेव्हा त्याबद्दल गप्पा मारणे चांगले नाही, परंतु त्याने काही चुकीचे केले नाही हे समजणे गुन्हा आहे. कंगनाने काही म्हणण्याआधी अगदी काहीच क्षणपूर्वी हृतिक रोशनने आर्यनच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्यामुळे सोशल मीडियावर याच पोस्टमुळे कंगना बरसली अशी चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

हृतिकने या पोस्टमध्ये लिहिले कि,
माय डिअर आर्यन, आयुष्य एक अतिशय विचित्र प्रवास आहे. आयुष्य उत्तम आहे, कारण ते अनिश्चित आहे. पण देव दयाळू आहे. तो फक्त खंबीर लोकांच्याचीच परीक्षा घेतो. तुला माहित आहे की, तू खंबीर आहेस म्हणूनच हा प्रसंग तुझ्यावर ओढवला आहे. या अफरातफरीत तू स्वत:ला सांभाळू शकतोस, हे तुला ठाऊक आहेच. अशा परिस्थिती तुम्हाला राग,गोंधळ, असहाय्य्यता वाटणं अत्यंत साहजिक आहे आणि एखाद्या हिरोला यातून बाहेर पाडण्यासाठी यासर्व गोष्टींची आवश्यकता असतेच. मात्र सावध राहा कारण याच गोष्टी तुम्हाला जाळून राखसुद्धा करू शकतात. त्यामुळे स्वतःमध्ये करुणा, दयाळूपणा आणि प्रेम या गोष्टी ठेवून स्वतः ला जळण्याची परवानगी द्या.

View this post on Instagram

A post shared by Appol Arinjo (@appolarinjo)

यश, अपयश, सुख,समाधान, चुका या सर्व गोष्टी समान आहेत. फक्त आपण ठरवायचं असतं की यातील कोणत्या गोष्टी आपण आपल्या जवळ ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी अनुभवातून दूर फेकून द्यायच्या. मात्र या सर्व गोष्टी शेवटी तुमच्याच आहेत. त्या सर्वांचे मालक व्हा. मी तुला लहानपनापासून ओळखतो. पण आता तू मोठा झाल्यावरही मला तुला जाणून घ्यायचं आहे. सगळं काही आत्मसात कर. जे काही अनुभव मिळतील, त्या तुला मिळालेल्या भेटवस्तू आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. एकदिवस, मागे वळून पाहशील तेव्हा तुला माझे हे शब्द आठवतील. सर्व भावनारुपी राक्षसाच्या डोळ्यात डोळे घालून पाहतांना शांत राहणार असतील तर उद्याचा दिवस तुझा असेल. येणारा दिवस सूर्याच्या तेजाने चमकेल. पण त्याआधी तुला अंधारातून जावं लागेल. शांत राहा, धैर्य बाळग आणि स्वत:ला सांभाळ. प्रकाशावर विश्वास ठेव, कारण तो तुझ्या आत आहे. मी तुझ्यासोबत आहे. लव्ह यू मॅन…

Tags: Arrested By NCBAryan KhanHritik RoshanInstagram StoryKangana RanautMumbai Cruise Drugs CaseShahrukh Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group