Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चक्क कंगनाने ‘या’ अभिनेत्रीला दिला क्विनचा दर्जा; कोण आहे हि अभिनेत्री..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 23, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
96
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीची धाकड गर्ल म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच चर्चेत असते. अभिनयापेक्षा कंगनाने नेहमीच परखड आणि स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध मिळवली आहे. अनेकदा ती विविध राजकीय मुद्दे आणि विविध सेलिब्रिटींवर बोलताना दिसते. त्यामुळे कंगना बोलली म्हटलं तरीही अनेकांना घाम फुटतो. सध्या ती तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि आता तिच्यामुळे अन्य एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. कंगनाने चक्क या अभिनेत्रीला क्वीन असं म्हटलं आहे. कंगनाकडून कौतुक..? क्या बात है.. पण हि अभिनेत्री आहे तरी कोण ते जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने कुणाचतरी कौतुक केलंय हि गोष्टच मुळात पचायला वेळ लागतो. पण हे असं झालं आहे. त्याच काय झालं.. कंगना रनौतने नुकताच दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर यांचा ‘सीता रामम’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यावर तिला जे वाटलं ते ती सोशल मीडियाच्या माध्यामातून बोलली. कंगनाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट शेअर करत ‘सीता रामम’ चित्रपटाची प्रशंसा केली. आता दुसऱ्यांचे सिनेमे पाहून नेहमी नाकं मुरडणाऱ्या कंगनानं ‘सीता रामम’ची प्रशंसा कशी काय केली..? हा मुद्दा वेगळा. शिवाय तिने या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचंदेखील कौतूक करत हि पोस्ट शेअर केली होती.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

अभिनेत्री कंगना रनौतने या चित्रपटाची प्रशंसा करत अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे की, ‘शेवटी मला सीता रामम चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळाला आणि हा खूप छान अनुभव होता. हे मला इथं सांगावंच लागेल. एक एपिक लव्ह स्टोरी, एक्स्ट्र्रा ऑर्डिनरी स्क्रीन प्ले आणि डायरेक्शन. हनु राघवपुडी यांचं अभिनंदन.. सगळ्या टीमनं उत्तम टीमवर्क केलं आहे.’ यासोबत पुढे आपल्या स्टोरीत तिने अभिनेत्री मृणाल ठाकूरची स्वतंत्ररित्या प्रशंसा केली आहे. तिने लिहिलं आहे कि, ‘तसं तर सगळ्याच कलाकारांनी खूप उत्तम काम केलंय. पण मला वाटतं सगळ्यात बेस्ट काम केलंय ते मृणाल ठाकूरने.. कोणतीही अभिनेत्री इतक्या शानदारपणे राजकुमारी नूरजहां म्हणजे सीता महालक्ष्मीची व्यक्तीरेखा साकारू शकली नसती, ज्या पद्धतीने मृणालनं काम केलं आहे.. म्हणावं लागेल कास्टिंग उत्तमच केलं आहे. ती खरोखरं क्वीन आहे…जिंदाबाद ठाकूर साब!’

View this post on Instagram

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

सांगायचे झाल्यास, दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर यांचा ‘सीता रामम’ हा चित्रपट एक तेलुगु चित्रपट आहे. गेल्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा संपूर्ण चित्रपट एक रोमॅंटिक ड्रामा आहे. जो राघवपुडी यांनी लिहिला असून त्यांनीच तो दिग्दर्शितदेखील केला आहे. याशिवाय अभिनेत्री कंगना रनौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ती सध्या आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ती पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारते आहे. शिवाय या चित्रपटाचे ती स्वतःच दिग्दर्शन करत आहे.

Tags: Bollywood ActressInstagram StoryKangana Ranautmrunal thakurviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group