हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने अभिनेत्री कंगना रनौत हि नेहमीच बेधडक बोलते. तिची काही विधाने वर्षानुवर्षे गाजतात. बहुतेकदा तिच्या विधानांचा वापर मिम्स बनविण्याकरिता नेटकरी करतात. पण यावेळी चक्क तिने श्राप दिला होता का काय.? अशी चर्चा रंगली आहे. काही काळापूर्वी कंगना आणि शिवसेनेत चांगलाच वाद रंगला होता. त्यावेळी, संजय राऊत यांनी कंगनावर थेट बोली केली होती. त्यानंतर, कंगनानेही शिवसेनेला अनेकदा लक्ष्य केले. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर कधी संजय राऊत यांच्यावर ती बरसताना दिसली. सध्या राजकीय वारे वेगळ्याच दिशेने वाहताना शिवसेना पक्षाचे खच्चीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची अडचणीत आली आहे. यामुळे सोशल मीडियावर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेलं एक ट्विट पुन्हा व्हायरल झालं आहे.
Karma hits back very badly. These were the words by Kangana Ranaut on September 9, 2020 when her office was demolished by BMC. Kangana's words come true. Today Uddhav Thackeray's arrogance got shattered. #UddhavThackarey #MahaAghadiRevolt #HindutvaForever #KanganaRanaut pic.twitter.com/IDZhtNkwiC
— M (@wtfiykyk) June 22, 2022
अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातील वाद सोशल मीडियावरही दिसून आला होता. जेव्हा हा वाद झाल्यानंतर कंगनाच्या मुंबईतील घराचा काही भाग मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडला होता. त्यानंतर, कंगनाने ठाकरेंवर टिका केली होती. यात कंगनाने एक व्हिडिओ ट्विट करुन,
आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड टुटेगा!
याद रखना, ये एक जैसा नही रहता, असे कंगनाने म्हटले होते. सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडींबाबत चर्चा सुरु असताना हा व्हिडीओ आणि ट्विट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. कंगनाने या ट्विटमध्ये म्हटलेलं वाक्य खरोखर सत्यात उतरतंय का काय असे वाटू लागले आहे. कारण, शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे तब्बल ३४ आमदार घेऊन शिवसेनेपासून दूर गेले आहेत. यामुळे शिवसेना खचते का काय..? असे वाटत आहे.
What’s happening in Maharashtra right now was predicted by her long ago.#MaharashtraPoliticalCrisis #KanganaRanaut #UddhavThackeray pic.twitter.com/G8574zBG2L
— ~VT🧃 (@im_on_dope) June 22, 2022
सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात विविध मंत्र्यांचे विविध डाव समोर आले आहेत. राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड तीव्र स्वरूपात होताना दिसत आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडी विरोधात एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा करीत हे तीव्र बंड पुकारले आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबतच राहणार कि वेगळे होणार..? शिंदे नवं सरकार आणणार का.? इ नवा पक्ष उभारणार..? असे अनेक सवाल जनतेच्या मनात उपस्थित झाले आहेत.
Discussion about this post