Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शिवसेनेवर नाराज कंगनाकडून एकनाथ शिंदेंसाठी कौतुकाचे सूर..?; इंस्टा स्टोरी चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Kangna_CMShinde
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलाने अनेकांना अवाक केले आहे. बुधवारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ठरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा हसत हसत राजीनामा दिला. या घटनेने अनेकांची मन भावुक झाली. पण याचवेळी अनेकांनी आनंद आणि जल्लोषही केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत जी टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहे तिने चक्क मंत्रिमंडळात झालेल्या बदलावर आनंद व्यक्त केला आहे. इतकेच काय तर मंत्री एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कंगनाने इन्स्टा स्टोरी शेअर करत त्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…!

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…#MaharashtraFirst

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022

एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅन्डलवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि एक कौतुकपर संदेश लिहिला आहे. यात कंगनाने लिहिलंय कि, ‘एकनाथ शिंदे यांची अत्यंत प्रेरणादायी अशी ही यशोगाथा आहे. आपला चरितार्थ चालावा म्हणून एकेकाळी रिक्षा चालवणारा व्यक्ती आज देशातील एक महत्वाचा आणि सर्वाधिक ताकदीचा मुख्यमंत्री होतो. सर, तुमचे खूप अभिनंदन..’ सध्या तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अडीच वर्षे सुरू असलेले मविआ सरकार कोसळले आणि ३० जून २०२२ रोजी सत्ता पालट झाला. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी संपन्न झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकांकडून विविध पद्धतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात कंगनाने शुभेच्छा दिल्याचं सोबत कौतुकही केले. कंगनाचा आणि शिवसेनेवर आधीपासून राग आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. कारण २०२० मध्ये मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत इमारतींवर कारवाई करताना तिच्या मुंबईतील ऑफिसचाही काही भाग पाडला होता. यावेळी कंगनाने शिवसेनेवर सडकून टीका केली होती. पण भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कंगनाचा सूर बराच बदलल्याचे दिसून आले आहे.

Tags: Eknath ShindeInsta StoryKangana RanautShivsenaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group