Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ज्युनिअर नाना पाटेकर’ने केला आत्महत्येचा प्रयत्न; जाणून घ्या कारण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 14, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
The Kapil Sharma Show
0
SHARES
109
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ हा प्रेक्षकांचा लाडका कॉमिक शो आहे. या शोमधून तीर्थानंद राव याने ‘ज्युनिअर नाना पाटेकर’ अशी ओळख मिळवली आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. दिवसेंदिवस प्रकाश झोतात येत असताना तीर्थानंदने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी त्याने आपण आत्महत्या का करत आहोत याची माहिती देताना सांगितले आहे कि, एक महिला त्याला ब्लॅकमेल करत आहे. सुदैवाने या आत्महत्येच्या प्रयत्नातून तीर्थानंद सुखरूप बचावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Tirthanand Rao (@tirthanandrao)

माहितीनुसार, अभिनेता तीर्थानंद याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर आता दुसऱ्यांदा तीर्थानंद रावने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये त्याने एक महिला आपल्याला कशा प्रकारे भेटली? कशी ओळख झाली? तिने आपल्याला कसे फसवले? याची सविस्तर माहिती दिली आहे. इतकेच नव्हे तर त्याने असेही म्हटले आहे कि, ‘माझ्या आजच्या परिस्थितीला ही महिला जबाबदार आहे. माझ्या आयुष्याचं काही बरं वाईट झालं तर मला न्याय मिळाला पाहिजे’. फेसबुक लाईव्हमध्ये असे म्हणत तीर्थानंद रावने आत्महत्येचा प्रयत्न केला. अभिनेत्याच्या फेसबुक लाइव्हची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस त्याच्या घरी पोहोचले. यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता.

 

यानंतर पोलिसांनी तीर्थानंदला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर लगेच उपचार सुरु झाल्यामुळे त्याचा जीव बचावला. तीर्थानंद रावने फेसबुक लाईव्हमध्ये ज्या महिलेचा उल्लेख केला आहे तिच्यासोबत तो लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता. या महिलेला २ मुली आहेत. तिने आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल केले आणि काही पैसे घेतल्याचा दावा तीर्थानंदने केला आहे. इतकेच नव्हे तर, ‘तिने माझ्यावर हात उचलला आणि ती मला लग्नासाठी ब्लॅकमेल करते आहे म्हणून मी फिनाइल घेऊन आयुष्य संपवतोय’, असे तीर्थानंदने यात व्हिडिओत म्हटले आहे. या व्हिडिओत त्याने या महिलेचे नावही सांगितले आहे.

Tags: Facebook LiveInstagram PostSuicide attemptTV Actorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group