हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा हे बिग बॉसच्या घरात तयार झालेलं कपलं नेहमीच काही ना काही कारणामुळे ट्रेंड होत असतं. आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी जणू ते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे वेळ, काळ, ठिकाणी याच्याशी त्यांचा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नसतो. पण यावेळी तर पठ्ठ्यांनी कहरच केला आहे. यावेळी ते चक्क सार्वजनिक ठिकाणी अगदी चार चौघात बिंधास्त किस करताना दिसले. हा काही साधा सुधा किस नव्हता तर लीप लॉक होता आणि यामुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल केलं जातंय.
सध्या सोशल मीडियावर तेजस्वी आणि करणचा हा लीपलॉक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, करण लिफ्टच्या अगदी जवळ उभा आहे आणि तो तेजस्वीला इंप्रेस करताना दिसतोय. यात तेजस्वीचे हावभाव पाहून वाटत आहे की ती देखील याच प्रतिक्षेत होती. तसा तेजस्वी आणि करण यांचा स्वतःचा असा वेगवेगळा चाहता वर्ग आहे. पण या व्हिडिओनंतर तर त्यांचे चाहते सुद्धा त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे असेही काही आहेत ज्यांनी या व्हिडिओचे कौतूक केले आहे. तर काहींनी या दोघांनाही चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
एका नेटकऱ्याने म्हंटले आहे की, अशाप्रकारचे व्हिडिओ पोस्ट करुन तुम्हाला काय मिळते..? तर आणखी एकाने म्हंटले आहे की, प्रसिद्धी मिळवण्याकरिता आणि चर्चेत राहण्याकरिता हे अस केलंचं पाहिजे का..? तर काहींनी तुम्ही आता लग्न करा.. असा सल्ला सुद्धा दिला आहे. तेजस्वी आणि करण हे बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये भेटले. इथेच त्यांच्यात प्रेम झालं आणि आता ते लवकरच लग्न करणार आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. याआधी सुद्धा ते अशा प्रकारे विविध ठिकाणी रोमँटिक अंदाजात स्पॉट झाले आहेत.
Discussion about this post