हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत न जाणे कित्येकांनी आपले जीव गमावले आहेत. सध्या संपूर्ण जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक स्वतःला हतबल समजू लागले आहेत. याकरिता मास्क लावा, सतत हात धुवा, सॅनिटायझर वापरा, असे आवाहन सरकार आणि कलाकार वारंवार करीत आहेत. आता करिना कपूरनेही लोकांना मास्क लावण्याचे आवाहन केले. इतकेच नव्हे तर योग्य पद्धतीने मास्क न लावणा-यांना तिने चांगलेच बोल लगावले आहेत. मात्र लोकांना दिलेला सल्ला तिलाच महागात पडलाय. या पोस्टवरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.
करीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मास्क निष्काळजीपणे वापरणा-यांवर तीने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ‘लोक इतके निष्काळजीपणे कसे वागू शकतात, हेच मला कळत नाही. देशात इतकी भीषण स्थिती असताना, हे असे कसे वागू शकतात? घराबाहेर पडताना योग्य पद्धतीने मास्क लावणे गरजेच आहे. पण अनेकजण चुकीच्या पद्धतीने मास्क लावतात. एकदा आपल्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफबद्दल विचार करा. ते मानसिक व शारिरीकदृष्ट्या कोलमड्याच्या स्थितीत आहेत. हे वाचणारा प्रत्येकजण कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी जबाबदार आहे. आता देशाला तुमची खरी गरज आहे,’ असे करिनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले.
करीनाची ही पोस्ट पाहताच ट्रोलर्सने तिच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. सामान्य लोकांना सांगणे सोपे आहे. जरा तुझ्या सेलिब्रिटी मित्रांनाही सांग, जे इतक्या कठीण काळात मालदीवमध्ये सुट्टीला गेलेत, असे एका युजरने करिनाला सुनावले़. तर एका युजरने करिनालाच सल्ला दिला. तुझा चुलत भाऊ आठवड्यापूर्वीच गर्लफ्रेन्डसोबत मालदीवमध्ये फिरून आला, प्लीज त्याला सांगतेस का? असे या युजरने लिहिले़. गर्लगँगसोबत पार्टी करताना तुला हे शहाणपण सुचले नाही का? असेही एका युजरने लिहिले. इन्स्टाग्रामवर उतारे लिहिण्यापेक्षा जरा देशवासियांना मदत कर, असादेखील सल्ला एका युजरने तिला दिला. एकंदर काय तर मास्क लावण्याचा सल्ला देऊन तिने स्वतःचीच अक्कल लोकांकडून काढून घेतली आहे.
Discussion about this post